• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home सोलापूर जिल्हा

बनावट सोने गहाण ठेवून गंडा घालणाऱ्या भामट्यांना दिल्लीतून अटक,मोहोळ पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी इंगळे साहेब यांची कामगिरी

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 7, 2021
in सोलापूर जिल्हा
0
बनावट सोने गहाण ठेवून गंडा घालणाऱ्या भामट्यांना दिल्लीतून अटक,मोहोळ पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी इंगळे साहेब यांची कामगिरी

मोहोळ-प्रतिनिधी

बनावट सोन्याच्या चैन तयार करून त्याला हॉलमार्क मारून महाराष्ट्र मध्ये विविध बँका, पतसंस्था व सोनारांना सोने गहाण ठेवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या टोळी चा  पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून दिल्लीतून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. गौरव संजय अग्रवाल (वय,३१), अंकुर अशोक गोयल (वय,२५) रा. हापूड, उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

             याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळेश्वर येथील गंगा ज्वेलर्सचे मालक मारुती रेवणकर यांना गावातीलच दोघाजणांनी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात २६ जानेवारी रोजी इस्माईल इन्नुस मणियार याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टोळीचा प्रमुख सूत्रधार आटपाडी तालुक्यातील पिसेवाडीचा मनोज मधुकर बनगर सह माढा तालुक्यातील भुताष्टे येथून बळी आबा जाधव, दिल्लीच्या एजंटशी संपर्क असणाऱ्या योगेश श्रीगुरेलाल शर्मा, एजंट म्हणून काम करणाऱ्या करगणी (ता. आटपाडी) येथील नवनाथ किसन सरगर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.

           या बनावट साखळ्यावर होलमार्क लावून फसवणूक करणाऱ्या एजंटचे धागेदोरे पोलिसांना दिल्ली येथे असल्याचे तपासात निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पो. कॉ. प्रवीण साठे, पो. कॉ. शरद डावरे यांचे पथक दिल्लीला दि.२ फेब्रुवारी रोजी रवाना झाले होते. पथक दिल्लीत आल्याची कुणकुण लागताच उत्तर प्रदेश मध्ये हापुड या गावामध्ये या सोनसाखळी यांना हॉल मार्क लावणारा गौरव संजय अग्रवाल (वय,३१) रा. हापूड, उत्तर प्रदेश याने दिल्लीतून धूम ठोकत मेरठ गाठले होते. परंतु पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दिल्लीच्या चांदणी चौकातून साईनाथ कुरियर च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सांगली, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या पाच जिल्ह्यात कुरियर च्या माध्यमातून सोनसाखळ्या पाठवणारा अंकुर अशोक गोयल (वय,२५) रा. हापूड, उत्तर प्रदेश या दोघांना ताब्यात घेऊन मोहोळ पोलिस स्टेशनला आणले आहे. 

याबाबत अधिक माहिती घेतली असता गौरव संजय अग्रवाल हा सोन्याच्या ओरिजनल हॉल मार्क असणाऱ्या केवळ कड्या मागवायचा व सोन्याच्या साखळी चा मुलामा असणाऱ्या बनावट साखळ्या त्या हॉलमार्क च्या कडी ला जोडून अशा बनावट साखळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक एजंटांमार्फत कुरिअर द्वारे पाठवून बँका पतसंस्था व सोनारांची फसवणूक करण्याचा हा गोरखधंदा अखेर उघडकीस पोलिसांच्या तपासात आला आहे.

या दोन्ही आरोपींना दि. ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्याकडून या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे पोलीस कॉन्स्टेबल साठे पोलीस कॉन्स्टेबल शरद ढावरे हे करीत आहेत.

Tags: मोहोळसोलापूर

Related Posts

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे
देश-विदेश

भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे

April 13, 2025
Next Post
5 लाखात सुरू करा व्यवसाय महिना 70 हजार कमवा,सरकार ही करेल मदत 🎯

5 लाखात सुरू करा व्यवसाय महिना 70 हजार कमवा,सरकार ही करेल मदत 🎯

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .