पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाले 6 व्हेंटीलेटर
युवासेना पंढरपूर विभागाच्या वतीने माळशिरस ग्रामीण रुग्णालयात बायपॅप व्हेंटिलेटरचे लोकार्पण…
माळशिरस (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हा युवाधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी केलेल्या मागणीनुसार युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी 6 व्हेंटिलेटर बायपॅप मशिन्स मिळाल्या आहेत. या मशिन्स मिळवण्यासाठी युवासेना कोअर कमिटी सदस्य रुपेशजी कदम व युवासेना राज्य विस्तरक विपुल पिंगळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज माळशिरस रुग्णालय येथे दोन व्हेंटिलेटर बायपॅप मशिनचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माळशिरस उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसिलदार जगदीश निंबाळकर, गट विकास अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. शहा, माळशिरस ग्रामीण रुग्णालय डॉ शिंदे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते, पंचायत समिती सदस्या सौ प्राजक्ता वाघमारे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे, नगर सेवक मारुतीआप्पा देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर यांच्यासह जिल्हा चिटणीस दत्तात्रय गोरे, रणजित दादा गायकवाड, किरण भांगे हे उपस्थित होते
कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सरकार, प्रशासन व अधिकारी यांच्या एकजुटीमुळे व अथक प्रयत्नांमुळे यश मिळाले, परंतु लाटेमध्ये व्हेंटिलेटर मशिन्सचा तुटवडा व खाजगी दवाखान्यात आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा बिले यामुळे सर्वसामान्य जनता भरडून गेली होती, अश्या परिस्थितीत गोरगरिबांसाठी मोफत व्हेंटिलेटर सुविधा मिळावी यासाठी व तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शासकीय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयासाठी काही व्हेंटिलेटर बायपॅप मशिन द्यावेत अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्याकडे एप्रिल महिन्यात केली होती. या मागणीला यश आले असुन आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून तातडीने 6 व्हेंटिलेटर बायपॅप मशिन सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाल्या आहेत. यापैकी 2 उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, 2 सोलापूर महागरपालिका तर 2 मशिन माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध झाल्या आहेत अशी माहिती श्री वाघमारे यांनी बोलताना दिली.
या कार्यक्रमावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर गट विकास अधिकारी स्मिता पाटील व उपजिल्हा रुग्णालय अकलूज चे डॉ शहा यांनी मनोगत व्यक्त वरून वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी माळशिरस ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.