• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

उपसरपंच पदाच्या निवडीवरून सदस्याची हत्या; भाजपा व राष्ट्रवादी तुंबळ हाणामारी ,अनेक सदस्य जखमी !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 4, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
उपसरपंच पदाच्या निवडीवरून सदस्याची हत्या; भाजपा व राष्ट्रवादी तुंबळ हाणामारी ,अनेक सदस्य जखमी !

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे असे मयत सदस्याचे नाव आहे. तर या मारामारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत.

जखमींना सांगली च्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे.
पांडुरंग काळे यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले आणि राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार या रागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आणि ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला असून यात एका ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू झाला आहे. जनार्दन काळे (वय 57) असे खून झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. तसेच आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उपसरपंच निवडीवरुन हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी गावात जाऊन जमाव पांगवला. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत.

बोरगावमधील नामदेव पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमन पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणनिती आमदार सुमन पाटील गटाने आखली होती. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. दरम्यान या घटनेमुळे बोरगाव गावासह तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात खळबळ उडाली आहे

Tags: #satara#बोरगाव#भाजपाSangaliराष्ट्रवादी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
दहावी , बारावी परीक्षेची तारीख ठरली ; शालेय शिक्षणमंत्री यांची माहिती !

दहावी बारावी परीक्षा ऑफलाईन : विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत आहेत तेथेच परीक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .