तरंगफळ गावच्या च्या उपसरपंच पदी सौ. सुलोचना वाघमोडे यांची वर्णी
माळशिरस विशेष तालुका प्रतिनिधी : युवराज नरुटे(9011394020)
तरंगफळ गावच्या उपसरपंच पदी सौ. सुलोचना वाघमोडे यांची वर्णी लागली , नुकतेच उपसरपंच श्री अविनाश तरंगे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले, रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच माऊली कांबळे याच्या अध्यक्षतेखाली सभा झाली व त्यावेळी सौ वाघमोडे यांची बिनविरोध निवड झाली अशी माहीती निवडणूक अधिकारी ए एम सरवदे यांनी दिली.
यावेळी माऊली कांबळे, सुरेश तरंगे , रावसाहेब वाघमोडे, पोलीस पाटिल जयसिंग साळवे, लाला साळवे, सर्जेराव पिंगळे, भगवान तरंगे, तानाजी वाघमोडे, सावळा कांबळे, महावीर कांबळे ग्रामसेवक पानसरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी नूतन उपसरपंच सौ सुलोचना वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला.