पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे.
उद्या सकाळी संबंधित तज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या तज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी उत्तम कामगिरी केली. सदर इन्स्ट्यिट्यूट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून इन्स्टिट्यूट इमारतीचे फायर ऑडीट, एनर्जी ऑडीट तसंच इतर आवश्यक तपासण्यांची पुर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल.