• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा : सरकारने लक्ष घालण्याची गरज !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 20, 2021
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा : सरकारने  लक्ष घालण्याची गरज !

शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा : सरकारने लक्ष घालण्याची गरज !

कोरोनामुळे विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काम करणारे शिपाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक, ग्रंथपाल, टेक्निशियन यांच्या नोकरीवर गदा आली आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विनाअनुदानित शाळांनी या कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा बंदचा फटका विषय आणि कला शिक्षकांनाही बसला असून बहुतांश शाळांनी एप्रिल महिन्यापासून शिक्षकांना वेतन दिलेले नाही, तर काही शाळांनी शिक्षकांना कामावरून कमी केले आहे.

या सर्व शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱया शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा जगण्याचा संघर्ष लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतरही कायम राहिला आहे.
अनेक शाळांनी केवळ ऑनलाइन वर्ग सुरू असल्यामुळे शिक्षकांना अवघे 50 ते 25 टक्के वेतनच देऊ केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱया अनेक शिक्षकांना पुन्हा व्याख्यान घेण्यासाठी न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सरकारने लक्ष घालण्याची अपेक्षा

तासिका तत्त्वावर काम करणाऱया नेट-सेटधारक शिक्षकांचे मानधन बंद करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी या शिक्षकांची सेवाच थांबविण्यात आली आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी स्पष्ट केले.

अशी होते कर्मचारी कपात

गणित विषय शिकवण्यासाठी दोन शिक्षक असतील तर आता एकच शिक्षक ठेवण्यात आला आहे. याच शिक्षकाकडून सर्व वर्गांचे ऑनलाइन शिक्षण करून घेतले जात आहे. यामुळे एका शिक्षकाला एक वर्षासाठी कामावर येऊ नये असे सांगण्यात आले आहे. काही शाळांमध्ये क्रीडा व कला शिक्षकांची नियुक्ती केली होती. या शिक्षकांनाही घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

Tags: CmoCmo maharashtraEducation departmentUddhav thakreyVarsha gaikvadमहाराष्ट्र शासन

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
गारवड ग्रामपंचायत वरती भाजपचा झेंडा : के  के पाटील यांच्या हस्ते सत्कार !

गारवड ग्रामपंचायत वरती भाजपचा झेंडा : के के पाटील यांच्या हस्ते सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .