माळीनगर मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती उत्सव हे मोठ्या प्रमाणात केले जाते. माळीनगर हे गाव फुले शाहू आंबेडकर चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच ह्या ही वर्षी फुले शाहू आंबेडकर जयंती निमित्त मीटिंग घेण्यात आली व पदाधिकारी निवड
करण्यात आली. फुले शाहू आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे नूतन अध्यक्ष- भैय्यासाहेब कांबळे उपाध्यक्ष -आदेश माघाडे खजिनदार- प्रीतम कांबळे सहखजिनदार – मल्हारी वजाळे सेक्रेटरी-समाधान वजाळे सह सेक्रेटरी- दिलीप बनसोडे, संकेत गायकवाड
सल्लागार-नंदेश तिकोटे, सोमनाथ कांबळे, उमेश जगताप, सुरेश बनसोडे, आकाश बनसोडे, तुकाराम वजाळे, व संरक्षण प्रमुख -अभिजीत वजाळे, संतोष कांबळे ,योगेश वाघमारे, सुमित बनसोडे, सिद्धार्थ कांबळे, रोहित सोनवणे, प्रतीक ओव्हाळ यांची समाजाच्या वतीने निवड करण्यात आली.