शनिवार रोजी (दि.1/10/2022) सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यु काॅलेज चांदापूरी ता. माळशिरस जि.सोलापूर येथे अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकारणी समितीचे कार्यकर्ते मा.पाचार्य ढोक सर, (पाचार्य-माॅडेल हायस्कूल माळीनगर,महाराष्ट्रराज्य अंधश्रद्धा निर्मुलन समिती),मा.श्री.पाटील सर (मुख्याध्यापक-प्राथमिक विभाग माळीनगर )मा.श्री.सोनवणे सर कार्याध्यक्ष अंधश्रद्धा निर्मुलन समिती व योग शिक्षक माळीनगर.,मा.श्री.कांबळे सर सायन्स विभाग कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर तसेच मा.श्री.विनायक माळी -मंगळवेढा पूर्णवेळ कार्यकर्ता अंधश्रद्धा निर्मुलन समिती महाराष्ट्रात राज्य.इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
तसेच सोशल संस्थेच्या सचिवा डाॅ.पंचशिला लोंढे मॅडम ही कार्यक्रमास उपस्थित होत्या.त्यावेळी त्या म्हणाल्या अंधश्रद्धा निर्मुलन नुसते मोहिमेची कार्यक्रम पाहुन प्रोत्साहीत होऊन तसा विचार करणे नव्हे तर स्वतःमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून ,विचार करुन तसे आचरण करणे म्हणजेच खरे अंधश्रद्धा निर्मुलन होय.आणि विज्ञानवादी दृष्टिकोनच अंधश्रद्धेला समूळ नष्ट करु शकतो.अंनिस चे हे कार्य फार महत्वाचे आहे व हाच विचार डॉ.दाभोळकरांचा होता त्यातून हजारो दाभोळकर तयार होऊन विज्ञानवादी भूमिका साकारतील हे वास्तव आहे.
कार्यक्रमात अ नि स च्या समितीने अनेक अंधश्रध्दा निर्मुलनाचे प्रयोग करुन दाखवले.ते आमच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी बारकाईने निरिक्षण केले.त्या मागील अंधश्रद्धेचे ढोंगी पणा असुन त्यामागचे वैज्ञानिक सत्य आहे हे विद्यार्थ्यांना पटले.
कार्यक्रमाच्यावेळी सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यु काॅलेज चांदापूरीचे प्राचार्य- प्रा.के.एस.साठे,प्रा.एन.बी.सरक,प्रा.ए.ए पठाण.तसेच धुमाळ सर,प्रा.काळे मॅडम,अरुणा लोंढे मॅडम व क्लर्क आकाश सरतापे सर, शाळा व्यवस्थापन समितेचे अध्यक्ष बाळासाहेब जाडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्यावेळी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला.