निरा नरसिंहपुर: दिनांक-3 ,
प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे.
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे चैतन्य विद्यालय व कै. सुधाकर गोविंद महाविद्यालयामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त भोंडल्याचा कार्यक्रम हा सौ. दुनाखे मॅडम आणि नीता निकते मॅडम यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये चैतन्य विद्यालयातील तसेच पंचक्रोशीतील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. चैतन्य विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत येणाऱ्या सर्व माता भगिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व मुलींनी व माता-भगिनींनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले व कार्यक्रमाचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती ही सौ.विनाताई श्रीकांत दंडवते आणि सौ. स्वाती सिद्धार्थ सरवदे, सौ.आशा गोरख लोखंडे तसेच नीरा नरसिंहपुर गावातील व पंचक्रोशीतील माता भगिनींनी लावली. कार्यक्रमाचे आयोजन हे प्राचार्य श्री. गोरख लोखंडे सर आणि सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांना फराळ वाटप करून आणि चहापान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
