• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

भूदान, पट्ट्यांच्या जमीनीची सर्रास विक्री. 👉 जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पि आर पी (PRP)निवेदन. 👉 महसूल विभाग योग्य कारवाई करणार का❓

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 12, 2022
in महाराष्ट्र, सामाजिक
0
भूदान, पट्ट्यांच्या जमीनीची सर्रास विक्री.                                  👉 जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पि आर पी (PRP)निवेदन.                                                                      👉 महसूल विभाग योग्य कारवाई करणार का❓

गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. 11 जुलै 2022:-
गडचिरोली आणि आसपासच्या शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करून, आणि उत्पादन घेऊन कौटुंबिक उपजिवीका करता येईल या उदात्त हेतूने शासनाकडून जमीनीचे वाटप करण्यात आले. परंतु शहरातील काही महाभागांनी , लॅंड डेव्हलपरनी पैशाच्या जोरावर अनेक शेतकरी, कामगार यांच्या जमीनी आमीश दाखवून विकत घेऊन आणि त्या जमीनीचे प्लाटमध्ये रुपांतर करुन अमाप भावाने विक्री सुरू केली आहे. या बाबींकडे मा. जिल्हाधिकारी यांनी तसेच संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पराकोटीने लक्ष केंद्रित करून हा प्रकार थांबवुन जनतेला योग्य न्याय द्यावा.


सध्याच्या स्थितीत गडचिरोली शहरात प्लाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. त्यासाठी अनेक एजंट, दलाल पैसे मिळाले पाहिजे म्हणून काम करीत आहेत. भूदान – पट्ट्याच्या जमीनी अशा प्रकारे विकल्या गेल्या तर अनेक शेतकरी – शेतमजूर भूमीहीन होऊन उपजीविकेचे साधनांपासून वंचित राहातील यात शंका नाही.
शासनाने उपजिवीका करण्यासाठी दिलेल्या जमीनी ह्या मा. जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय विकता येत नाही. किंवा हस्तांतरित करता येत नाही असा नियम असला तरी गडचिरोली येथे जमीनी विकत घेऊन प्लाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. यासाठी महसूल विभागच छुप्या मार्गाने परवानगी देत आहे का❓ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्लॉट तयार करतांना शासकीय कार्यालयात जाऊन बरेच कागदपत्रे तयार करावी लागतात. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळे झाकून काम करतात का❓गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव, कोटगल , इंदाळा, पारडी गोगांव,अडपल्ली परिसरात अनेक शेतकरी , कामगारांना उपजिविका करण्यासाठी शासनाने पट्ट्याची शेतजमीन दिली आहे. मात्र या जमीनी विकत घेऊन आणि त्या जमीनी चे प्लाट करून विविध प्रकारच्या मार्गाने विकली जात आहे. गडचिरोली शहरात असे अनेक महाभाग अशा जमीनी विकत घेऊन आणि ले आऊट टाकून बिनधास्तपणे विकत आहेत. या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यास्थितीत कोटगल येथील वसंत मेश्राम यांना शासनाकडून मिळालेली जमीन श्याम कश्यप यांनी विकत घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वसंत मेश्राम भूमीहीन होणार नाही यासाठी श्याम कश्यप यांनी आगळे वेगळे मार्ग शोधून भूदानाची मिळालेली जमीन विकत घेण्याचा बेकायदेशीर पद्धतीने कट रचला आहे. श्याम कश्यप यांनी प्लाट विक्रीचा व्यवसाय करीत असताना सोबत असलेल्या बिझनेस पार्टनरचीही फसवणूक केल्याचे कोटगल परीसरात चर्चिले जात आहे. सोबत ज्यांचे सहकार्य लाभले त्यांना ही लाभांशची रक्कम दिली नाही. लाभांशची रक्कम मागीतली असता वारंवार टाळाटाळ केली जाते . लाभांशची रक्कम अदा करण्यासाठी दिलेले धनादेशही वटले नाही. याबाबत सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी.


या मागणीसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी पिरिपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली चक्रधर मेश्राम, संदीप बालखेडे, प्रकाश बंडवाल, जीवन मेश्राम, पत्रकार अनुप मेश्राम, रोशन उके यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई, मा. महसूल मंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मा.जिल्हाधिकारी,
यांना निवेदन देण्यात आले.

Tags: #cmomaharashtra#PRPजोगेंद्र कवाडेमहसूलमुख्यमंत्रीरिपाई

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

वृक्षतोड केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, या संदर्भाचे वृक्ष प्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांचेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .