बुद्धम् शरणम् गच्छामि !
धम्मम शरणम गच्छामि !!
संघम शरणम गच्छामि !!!
हे म्हणावे व एका रात्रीत यशाच्या शिखरावर स्वतःला बंदिस्त करावे…!
ध्यानधारणेच्या डोहात डुबकी मारून धन्य व्हावे
बुद्धाच्या पायाला स्पर्श करून बुद्धगयेला विचारावे मुक्ती कोण पथे…!
बुद्धगया म्हणजे काशी ?
बुद्धगया म्हणजे मक्का मदिना? असे म्हणत बसावे…!
तीर्थ रसाच्या आत्मिक भक्तीत मग्न होऊन डोळे बंद करून कर्मकांडाचे अनुकरण करावे की स्वतःचा ऊर बडवून जगाला सांगावे जीवन शाश्वत ईश्वर मिथ्या आहे…!
सदगुणी व दुर्गुणी लोकांनी चिकित्सेच्या कुर्हाडीवर स्वतःचे हृदय घासावे ….!
हे ईश्वर
हे अल्ला
हे येशू
हे नानक
हे महावीर
हे तथागत
असे म्हणत
भळभळणाऱ्या लाल भडक रक्ताला हुंदके देऊन बोलावे….!
आया-बहिणींची अब्रू लुटणारे…..
गुप्तांगात खुंटया ठोकणारे……
सूर्यप्रकाशात शेकोटी करुन घरे-दारे उद्ध्वस्त करणारे…..
जिवंत माणसाचे तुकडे करणारे…..
विटाळात स्त्रीला शूद्र समजणारे……
धर्माचे बाजार भरवणारे….
श्रमिकांचे रक्त पिणारे……
दैवत्व च्या नावावर गलेलठ्ठ होऊन गरोदर बाईस लाजवणारे…..
शेतकऱ्याच्या धानास भाव न देणारे……
बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या रक्तामासाची भेळ करून खाणारे…..
मनूच्या पिढया वाढवणारे…..
माणूस असून माणसाला पशु समान वागवणारे…..
हे कोणत्या रक्ताचे……?
बुद्धाला विचारावे डोळे उघडावे की कायमचे बंद करावे
मानवतेचे गीत गाऊन…!
बुद्धम् नमामि !
धमम्म नमामि!!
संघम नमामि!!!
हेच गीत अबाधित जगभर घुमावे…!
बुद्धतत्वाचे व ममत्वाचे अंगाई गीते तुम्ही आणि आम्ही सर्वांनीच एक दिलाने म्हणावे…
बुद्धाला विचारावे….!
डोळे मिटावे की उघडे ठेवावे?
डॉ.कुमार लोंढे
मो.9881643650 (सोलापूर)