सेंट्रल हुमन राईट संघटन च्या वतीने सोमवार दिनांक २१ रोजी विभागीय आयुक्त कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
पुण्यातील शासकीय भूखंडावर टोलेजंग हॉस्पिटल उभा आहेत याचा लाभ आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मिळाला पाहिजे व राखीव बेड ठेवले पाहिजेत.निवृत्त सैनिकांना शासनाचे सर्व लाभ मिळावे.पुण्यातील खाजगी शाळा नियमबाह्य सावकारी पद्धतीने फी वसूल करतात यांची मान्यता रद्द करावी.बार्टीचा निधी इतरत्र वळवू नये. विद्यावेतन वाढ करावी व शिष्यवृत्ती तात्काळ अदा करावी.शासकीय कर्मचारी ,शिक्षक यांनी नेमणूक केलेल्या ठिकाणी न राहिल्यास गुन्हे नोंद करावेत.संविधान विरोधी गरळ ओकणाऱ्या अजय शेंगर वर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची अंमलबजावणी करावी.बोगस वसतिगृह चालवणाऱ्या संस्थाचालक व अधिकारी यांचेवर गुन्हे नोंद कारवेत इ मागण्यासह एकूण बारा (१२) मुद्दे व त्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे,समाजकल्याण आयुक्त पुणे,बार्टी पुणे,जिल्हा पोलिस प्रमुख पुणे,विभागीय आयुक्त पुणे, यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.
तर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री व राज्यपाल महोदय यांना ही दिल्या आहेत.सदर निवेदनावर सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष मा.डॉ.कुमार लोंढे,संचालक मा.संजय होवाळ, मा.दिनेश बिरवाडकर ( म.राज्य अध्यक्ष उद्योग विभाग) मा.धनंजय डांगळे (राज्य अध्यक्ष प्रोटेक्टिव्ह सेल),मा.ऋषिकेश ठाकूदेसाई (पुणे जिल्हा उपाध्यक्ष) इ च्या सह्या आहेत.
वरील मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यलयासमोर धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती पदाधिकारी यांनी जनविद्रोही चॅनल दिली आहे