श्रीपुर,
एच .व्ही .देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी, हडपसर, पुणे व चिंतामणी बहुउद्देशीय विकास संस्था, फलटण यांच्यावतीने डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटपाचा कार्यक्रम (आनंद नगर) श्रीपुर येथे राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. संभाजी जगदाळे, श्री. रमेश केंगार व परिचारिका. सौ.अंबिका ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
डोळे तपासणी साठी श्रीपूर परिसरातील बहुसंख्य लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली.
यामध्ये 25 जणांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. निर्मला गोविंद पाटील व मदतनीस शहनाज इसाक सय्यद यांनी महत्त्वाचे योगदान दिले.