|चांदापुरी प्रतिनिधी|
चांदापुरी (ता. माळशिरस) येथे शेख- कोळपे वस्ती शाळेजवळ शासकीय व खाजगी जमिनीवर सावली देणारे व शोभिवंत 120 देशी झाडे ठिबक सिंचनासह नेचर लवर्स फाउंडेशन च्या वतीने पुणे येथील प्रशासकीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख साहेब यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. व तेथे दोन दिवसात मुसाफिर पार्कची निर्मिती करण्यात आली.
या पार्क मध्ये विद्यार्थी ,वाटसरू, ग्रामस्थ यांच्या विश्रांती आणि मनोरंजनासाठी सर्व सुविधा फाउंडेशनतर्फे निर्माण करीत असून पुढील सर्व देखभाल करीत आहेत. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख म्हणाले.प्रत्येकाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ व “मरावे परी वृक्षरुपी उरावे” या उक्तीनुसार झाडे लावणे व त्याचे संवर्धन करणे सामाजिक कर्तव्य आहे. हे मुसाफिर पार्क हुसेन वजीर शेख यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आले आहे.