सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली (CHRS) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे कोंढवा रोड रोड येथे पदाधिकारी निवडी व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी (CHRS) उद्योग व सोशल विभाग राज्य प्रमुखपदी दिनेश बिरवाडकर तर प्रोटेक्टिव्ह सेल च्या राज्य प्रमुखपदी धनंजय डांगळे ( Ex Defense officer) यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी डॉ.कुमार लोंढे म्हणाले “मस्तवाल,प्रस्थापित, भ्रष्ट अधिकारी यांना वठणीवर आणण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे महिला, मुले,वंचित यांचे अश्रू पुसण्यासाठी जात धर्म न पाहता आपण मानवी मूल्याच काम केले पाहिजे व पुण्यात पदाधिकारी यांचे कार्य जोमात आहे.”यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिनेश बिरवाडकर यांनी तीन संगणक व लपटॉप भेट स्वरूपात संघटनेस दिले त्याबद्दल सदाशिवराव निवासी प्रशाला व ज्यु कॉलेज मार्फत विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सेंट्रल ह्यूमन राईट चे उत्तरप्रदेश हेड ओंकार शर्मा,ऋषिकेश ठाकुरसारदेसाई लोकजनशक्ती च्या पुणे अध्यक्ष जगताप म्याडम,धिवर सर,पिल्ले सर,प्रा.राजेश वायदंडे,सागर फडतरे इ मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम प्रास्तविक व सूत्रसंचालन पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास देसाई यांनी केले