सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांचे आदेशानुसार व सोलापूर जिल्हा अध्यक्ष पिंटू महाराज यांच्या नेतृत्वाखाली (CHRS) मोहोळ महिला तालुका अध्यक्ष पदी शांताताई पवार यांची निवड करण्यात आली.
चिंचोली येथे भव्य पदाधिकारी निवड सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे म्हणाले तुमच्यावर अन्याय ,अत्याचार,मानवी हक्कांची पायमल्ली व न्याय मिळत नसेल अशा ठिकाणी मी व आपले chrs संघटन आपल्या पाठिशी आहोत.पिंटू महाराज यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सेंट्रल ह्यूमन राईट च्या नूतन मोहोळ महिला तालुका अध्यक्ष शांताबाई पवार यांचा डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते सत्कार करून निवड पत्र देण्यात आले
कार्यक्रमास युवक नेते प्रदीप सरवदे,माळशिरस तालुका अध्यक्ष सदानंद बनसोडे महिला,युवक वर्ग,ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.सदरच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐