सोशल डेव्हलपमेंट सोसायटी संचलीत सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज पहिली (सेमी मराठी) ते बारावी ( आर्ट,सायन्स,कॉमर्स) सुरू असून गतवर्षी चारशे च्या आसपास मुले शिक्षण घेत आहेत दहावी व बारावीचा निकाल प्रत्येक वर्षी 100% असाच आहे.याचा लाभ सर्वाना होत आहे.
संस्थापक डॉ.कुमार लोंढे यांच्या प्रयत्नाने शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयत्न सुरू आहेत त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या शैक्षणिक कार्याची ची दखल घेऊन आंतराष्ट्रीय शिक्षण परिषद मध्ये सहभाग नोंदवून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार ही मिळाला आहे.पाठीमागील वर्षी डॉ.आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र चालू केले आहे.
सोशल संस्था संचलित आनंद कॉलेज व इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून
BA,BCOM, BSC,
BBA, BCA, BLIB, MA, MCOM,MSC,MCA,
MLIB,MBA
इ कोर्सेस करता येणार आहेत
सदरचे कोर्सेस मान्यताप्राप्त असून विद्यापीठ ( UGC ) अनुदान आयोग ग्रेड A नामांकन असणारे विद्यापीठ आहे व विद्यापीठाकडून संस्थेस VP0379 असा कोड ही भेटला आहे.
विद्यार्थी यांना एकाच ठिकाणी विविध कोर्सेस ची संधी मिळणार आहे याबाबत अधिकृत माहिती संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे यांनी दिली आहे