• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 19, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेल्या 15 लाख 96 हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्फोटक साहित्य जप्त.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 2, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सामाजिक
0
नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेल्या 15 लाख 96 हजार रुपयांच्या रोख रकमेसह स्फोटक साहित्य जप्त.

गडचिरोली जिल्हा पोलीस दलास मिळाले यश.

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी ( चक्रधर मेश्राम) दि 2 जुलै 2021:-

गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारच्या विकास योजना आणि शासकीय कामे केली जातात. मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या शासकीय खाजगी बांधकामे कंत्राटदार , तेंदूपत्ता ठेकेदार , सामान्य नागरिक यांचे कडून नक्षलवादी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करून ती रक्कम देश विघातक कृत्यांसाठी वापरली जाते. तसेच खंडणीतुन जमा झालेल्या रक्कमेचा विनियोग शस्त्रसाठा साहित्य, दारू गोळा या कामात वापरल्या जातो.. नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्यात पैसे, दारुगोळा , आणि शस्त्रसाठा गोपनिय ठेवतात अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज दि. २ जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली .


दि. १ जुलै २०२१ रोजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करुन सी /६० आणि इतर अनेक अभियान पथकांच्या जवानांनी मिळून एटापल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोमके हालेवारा हद्दीत, कुदरी जंगल परिसरात खूप मोठी जोखीम घेऊन नक्षल विरोधी अभियान राबविले. या अभियानात गडचिरोली पोलीस जवानांना खुप मोठे यश मिळाले. त्यात १५ लाख ९६ हजार रुपये रोख रक्कम,, ४ इलेक्ट्रॉनिक बटन , ३ डेटोनेटर , २ वायर बंडल , १ वाकिटाकी , नक्षल पांम्पलेट, बॅनर , पिटटु व इतर अनेक साहित्य हस्तगत करण्यात आले. सापडलेल्या नोटांमध्ये नवीन चलनात असलेल्या २००० रु. चा जास्त प्रमाणात समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेले सर्व साहित्य गडचिरोली जिल्ह्या पोलीस मुख्यालयात आणुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाच्या विविध प्रकारच्या कारवाया करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक ( अभियान) मनिष कलवानिया , अप्पर पोलीस अधीक्षक ( प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सदर डंप पोलीस जवानांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे या भागात नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात हादरा बसला आहे. गडचिरोली जिल्ह्य पोलीस दलाची तीक्ष्ण नजर नक्षलवाद्यांवर असल्याने खंडणी वसूल करणे नक्षलवाद्यांना आता अडचणीचे होणार आहे. गडचिरोली जिल्ह्या पोलीस जवानांच्या पथकांनी केलेल्या कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकांच्या जवानांचे मनपूर्वक कौतुक केले आहे. आणि सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान गतीमान करण्याचे संकेत दिले आहे.

Tags: #gadchiroli#ips#mumbai#police#pune#गडचिरोलीमहाराष्ट्र पोलीस

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
पुणे हादरलं! 5 मित्रांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 2 वर्षांपासून देत होते नरक यातना

पुणे हादरलं! 5 मित्रांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 2 वर्षांपासून देत होते नरक यातना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .