मुंबई : विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 26 जून 2021:-
महाराष्ट्र एसीबीने मुंबई पोलीस खात्यांमधील बरखास्त पोलीस अधिकारी, सचिन वांझे यांच्याकडे त्यांच्या कमाईपेक्षा अधिक असणाऱ्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. तपासणी पथकातील एका अधिकार्याने शुक्रवारी सांगितले आहे की, या सर्व प्रकरणाची खुली चौकशी करण्याचे आदेश एसीबीचे महासंचालक यांच्या आदेशावरून करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सचिन वाझे यांची चल व अचल संपत्ती त्यांनी कोणत्या मार्गाने कमावली आहे? या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे.?
सचिन वांझे याला २५ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये उद्योगपती, मुकेश अंबानी यांच्या घराच्या समोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केल्याच्या आरोपाखाली मार्च महिन्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवसात मनसुख हिरे यांची हत्या झालेल्या प्रकरणात ही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सचिन वांझे यांनी सुरू केलेल्या एका कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये दीड कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर अजून एक घटना समोर आली आहे की, सचिन वाझे याने पाठीमागील काही दिवसापूर्वी एका सहकाऱ्याला 76 लाख रुपये दिलेले आहेत. सचिन वांझे यांच्या अटकेनंतर एनआयए या पथकाने न्यायालयात सांगितले आहे की, या चौकशीत, सचिन वांझे यांच्याकडे येत असणाऱ्या पैशाचे स्त्रोत तपासण्यात येणार आहेत. तसेच हे ही तपासले जाणार आहे की, तो जे पैसे जमा करत होता, ते पैसे स्वतःसाठी जमा करत होता, की इतर दुसऱ्या कोणासाठी जमा करत होता. त्याच बरोबर सचिन वांजे यांच्या समकक्ष पदावर असणाऱ्या इतर अधिकार्याच्या नावावर एवढा पैसा कुठून जमा झाला आहे? याची ही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सचिन वांझे यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि लाचलुचपत यांच्या माध्यमातून जमा केलेल्या संपत्ती संदर्भात दोन गोपनीय तक्रारी दाखल झाल्या असल्याचे ही सांगण्यात आले आहे. त्याच्या नावावर तीन कंपन्या आणि आठ गाड्या आहेत. अशा पद्धतीने सचिन वाजे यांची कसून संपत्तीची चौकशी चालू आहे.