• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Sunday, June 22, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

गौतम अडाणी ग्रुप चा भंडाफोड – भारतातील काळा पैसा मॉरिशस मार्गे अडाणी ग्रुप मध्ये गुंतवला ???

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 24, 2021
in आर्थिक, देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
गौतम अडाणी ग्रुप चा भंडाफोड – भारतातील काळा पैसा मॉरिशस मार्गे अडाणी ग्रुप मध्ये गुंतवला ???

विश्लेषण केले अर्थ चेतना अभियानाचे किशोर गजभिये यांनी..

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25जून 2021:-

अडाणी ग्रूप चा शेयर 25 % ने गडगडले. NSDL ( नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटोरी लिमिटेड ) भारत सरकार ने अडाणी ग्रुप मध्ये मॉरिशस येथे नोंदनिकृत असलेल्या सहा इन्व्हेस्टमेंट कंपन्या , ज्या फक्त अडाणी ग्रुप मधेच 90 % च्या वर गुंतवणूक करीत होत्या , त्यापैकी तीन कंपन्यांना , त्यानी Source ऑफ fund ची माहिती दिली नाही म्हणून, त्यांचे इन्व्हेस्टमेंट अकाऊंट गोठविले.
ह्या सहा कंपन्या कोणत्या ?
APMS इन्व्हेस्टमेंट फंड ,
VESPERA फंड लिमिटेड
.CRESTA फंड लिमिटेड
ELARA इंडीया Opportunity फंड , ALBULA इन्व्हेस्टमेंट फंड. , LTS इन्व्हेस्टमेंट फंड
या त्या सहा कंपन्या होत.
या सहाही कंपन्या मॉरिशस येथे नोंदणी कृत असून तेथुन ऑपरेट करतात. मॉरिशस, केमन आयलंड इत्यादी देश अन्य देशातील काळा पैसा त्यांच्या देशात साठवण्यास, वापरण्यास आणि अन्यत्र वळ विण्यास मान्यता देतात. या सहा कंपन्या पैकी तीन कंपन्यांचे ऑफिस एकाच इमारती मध्ये आहे. ह्या कंपन्यांची वेब साईट नाही. एकूणच त्यांचा व्यवहार संशयास्पद आहे.
ज्या तीन कंपन्यांचे इन्व्हेस्टमेंट अकाऊंट माहिती न दिल्यामुळे NSDL ने गोठविले त्यांची नावे अशी- . APMS इन्व्हेस्टमेंट फंड
ALBULA इन्व्हेस्टमेंट फंड . CRESTA इन्व्हेस्टमेंट फंड

ह्या कंपन्यांनी अडाणी ग्रुप च्या ह्या सहा शेयर मार्केट मध्ये लिस्टेड कंपन्यांमध्ये 43,500 कोटी रुपयांची गुंतवणूक FPI ( फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ) गेल्या अनेक महिन्या पासून केली.

लिस्टड कंपन्या अश्या आहेत –
Adani Transmission Ltd, Adani Green Ltd .Adani Enterprises. Adani Gas Ltd. Adani Ports Ltd. Adani Power Ltd.

ह्या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट FPI म्हणून आल्यामुळे ह्या कंपन्यांचे शेयर किती वधारले ?
.Adani Transmission – 800 %. Adani ग्रीन – 450%
Adani Enterprises – 1200 % अडाणी Gas -1200 %
Adani Power -500%
अडाणी ग्रुप आपल्या प्रत्येक कंपनीसाठी कर्ज घेऊनच काम करतो. त्याचेवर प्रचंड कर्ज असूनही त्याला भारतीय बँकांनी कर्ज दिले. 2019 मध्ये अडाणी ग्रुप वर 1,28,000 कोटी रुपयांचे कर्ज होते.
त्यांच्या कंपन्यांचे गुंतवणुकीचे मॉडेल असे आहे –
प्रमोटर ( गौतमअडाणी )74.9 %
विदेशी गुंतवणूकदार कंपन्या – 15 % छोटे खुर्दा ( किरकोळ) निवेशक -10% सरकारच्या (सेबी) च्या धोरणा नुसार प्रवर्तकाला जास्तीत जास्त 75 % च स्वतः ची गुंतवणूक करता येते. म्हणून गौतम अडाणीने 74.9% स्वतः साठी ठेवले. जनते साठी फक्त 10% व मॉरिशस च्या कंपन्यांचे 15 % असा हा देखावा होता.
ह्या सहा कंपन्या फक्त आणि फक्त अडाणी ग्रुप मध्येच इन्व्हेस्ट करत होत्या. खरे म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपन्या अनेक, म्हणजे शेकडो कंपन्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करीत असतात. पण असे दिसते की ह्या सहा कंपन्या अडाणी ग्रुप मधेच इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जन्माला आल्या होत्या. असे म्हणतात की भारतातला काळा पैसा भारताबाहेर पाठविला जातो. तेथून तो एका देशातून दुसऱ्या देशात, तेथून तिसऱ्या देशात व शेवटी मॉरिशस, केमन आयलंड, सीचेल्स अशा ‘टॅक्स हेवन ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात कंपनी स्थापन करून तेथे पार्किंग केला जातो. आणि तोच काळा पैसा FPI ( फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) म्हणून भारतात येतो. हे खरे “सत्य” आहे भारतातील FPI चे.
जगात कोरोना काळात FPI ला ब्रेक लागला होता. पण अडाणी ग्रुप मध्ये मात्र FPI सुरूच होते.
अडाणी ग्रुप वर केंद्रीय भाजपा सरकार मेहेरबान आहे हे सर्व श्रुत आहे. अलीकडेच अडाणी ग्रुप ला भारतातील सहा एयरपोर्ट खाजगी करणा अंतर्गत बहाल करण्यात आलेले आहेत. श्री नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना गुजरात मधील मुंद्रा पोर्ट, जेथुन गौतम अडाणी चा जास्तीत जास्त माल एक्स्पोर्ट होत होता, विकासा करीता हस्तांतरित करण्यात आले होते. आता ह्या तीन FPI कंपन्यांच्या वरील कारवाईमुळे डब्यावरचे झाकण उघडले आहे.
काळा पैसा, त्याची वाहतूक, पार्किंग, गुंतवणूक आणि व्यापार , शेयर बाजारातील घोटाळे, शेयर बाजारातील दलालांचे कारनामे, त्यावर आळा बसवायला भारत सरकारला आलेले अपयश, सामान्य गुंतवणूक दारांची फसवणूक आणि 5 ट्रेलियन इकॉनॉमी चे दिवास्वप्न या सर्व गोष्टींचा उलगडा आता होईल अशी रास्त अपेक्षा आहे. सामान्य लोकांना ह्या क्लिष्ट विषय आणि घोटाळ्याची माहिती व्हावी या शुद्ध हेतूने किशोर गजभिये अर्थ चेतना यांनी माहिती जनहिताच्या दृष्टीने प्रसारित केली आहे.

Tags: #adani group#latestnews#marathinews#news#मराठीबातम्या

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
आरक्षणाचा खरा अर्थ? ज्याच्या डोळ्यात आरक्षण खुपते त्यांच्यासाठी.. विश्लेषणात्मक आढावा.

आरक्षणाचा खरा अर्थ? ज्याच्या डोळ्यात आरक्षण खुपते त्यांच्यासाठी.. विश्लेषणात्मक आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .