शिवसेना वर्धापदिनानिमित्त पंढरपूर विभागात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन….
19 जूनच्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या वतीने सर्व प्रमुख पदाधिकारी यांची पंढरपूर येथे बैठक संपन्न झाली.
प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळ्या बैठकी मध्ये शिवसेना समन्वयक माननीय प्राचार्य शिवाजीराव सावंत यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या यावेळी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, कोरोणा लसीकरणाची जास्तीत जास्त नोंदणी, कोविड योध्यांचा सन्मान, कोविड काळात अनाथ झालेल्या झालेल्या कुटुंबांना मदत व दत्तक घेणे तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक प्राचार्य शिवाजीराव सावंत सर, अनिल दादा सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख जयंत माने, युवासेना जिल्हा युवाअधिकारी स्वप्निल वाघमारे तसेच शिवसेना – युवासेना – महिला आघाडी चे मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख, शहर प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी व शिसैनिक उपस्थित होते.