• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 20, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

गडचिरोली जिल्ह्यात टप्याटप्याने अनलॉक होणार ; अत्यावश्यक सेवा ,दुकाने इ बाबत चे नियम

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 6, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
The Lancet चा धक्कादायक अहवाल ; हवेतून पसरू शकतो कोरोना ; ठळक 10 मुद्दे वाचा…

गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु

प्रशासनाकडून स्टेज ३ नुसार अनलॉकबाबत नवीन आदेश जारी.

गडचिरोली, प्रतिनिधी चक्रधर मेश्राम, दि.05/06/2021:-

शासन निर्देशाप्रमाणे कोविड – 19 साथरोग संदर्भाने “ब्रेक द चैन अंतर्गत निर्धारित प्रतिबंधात्मक पातळी” अंतर्गत गडचिरोली जिल्हा हा पातळी-3 मध्ये मोडत असून शासन आदेशानुसार वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना कालावधी, सोमवार दि. 07 जुन 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात येणार आहेत.
त्याअनुषंगाने शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.
🔹अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने ही सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
🔹अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने ही सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
🔹रेस्टॉरेन्ट, उपहारगृह- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि इतर वेळेस पार्सल/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.
🔹सार्वजनिक स्थळे, खुले मैदान इ.- सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत सुरु असेल.
🔹खाजगी कार्यालये हे सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
🔹खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती- 50% उपस्थितीसह सुरु ठेवता येईल. याहून अधिक उपस्थिती गरजेचे असेल तर संबंधित विभाग प्रमुखाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
🔹क्रीडा- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत तर सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आऊट डोअर क्रीडा विषयक बाबी सुरू ठेवण्याची मुभा असेल.
🔹सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन इ. ठिकाणची गर्दीबाबत- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
🔹विवाह कार्यक्रम- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
🔹अंत्यविधी- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.
🔹स्थानिक.स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांचे बैठका व निवडणुकाबाबत- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे.
🔹बांधकाम-सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकाम स्थळावर कामास मुभा असेल परंतु कामगारांना दुपारी 4 वाजेनंतर काम करण्याची परवानगी नसेल.
🔹कृषी विषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
🔹ई-कॉमर्स ‘साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरु असतील.
जमावबंदी/संचारबंदी-सायंकाळी 5.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत एकत्रितरित्या 5 हून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
🔹व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ.- सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.
🔹सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- 100 टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येणार तथापि सदर वाहनांमध्ये आसनव्यवस्थे व्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल.
🔹आंतरजिल्हा वाहतूक नियमितपणे सुरु राहिल. तथापि दिनांक 04.06.2021 चे शासन आदेशानुसार निर्धारित पातळी-5 (Level-5) मधील जिल्ह्यात अतितातडीच्या कारणाकरिता ई-पास आवश्यक असेल.
🔹तसेच आंतरराज्य वाहतुकीसंदर्भात शासनातर्फे वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.
🔹उत्पादनसेवा-MSME- नियमितपणे सुरु असतील. उत्पादन सेवा
1.अत्यावशक सेवासंबंधी, 2. प्रोसेसिंग सेवासंबंधी, 3. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी, 4. डाटा सेंटर्स/क्लाऊड सर्विस प्रोवायडर/क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेवासंबंधी आयटी क्षेत्र- नियमितपणे सुरु असतील. उत्पादन सेवा (वरील मुददा क्र. 23 व 24 वगळून इतर सर्व प्रकारचे वैध)- नियमितपणे सुरु असतील तथापि 50% कर्मचाऱ्यांचे वाहूतकीस मुभा असेल.
🔹वरील विवरणपत्रातील ज्या-ज्या बाबींना दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असेल त्या ठिकाणांमधील व्यक्तींना-कामगारांना सायं. 5 पर्यंत स्वत:च्या घरी पोहाचणे गरजेचे असेल.
🔹कोविड-19 साथरोगसंदर्भाने कार्यरत कार्यालये, आरोग्य विभाग इ. 100 टक्के कार्यक्षमतेने कार्यरत राहील.

Tags: #gadchiroliCollector gadchiroliअन लॉक

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
मंत्रालयात बॉम्ब ; निनावी फोन तपासाला सुरुवात ‘कोण आहे गब्बर

ई पास ची राज्यात गरज नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .