अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातील खुडूस हे त्यांचे मुळगाव होय.नोकरीनिमित्त त्यांनी पुणे येथे वास्तव केले परंतु त्यांची नाळ अजूनसुद्धा गावाशी घट्ट आहे.विद्यापीठामध्ये नोकरी करत असताना त्यांना पुणे विद्यापीठाचे सदस्य होण्याचा बहुमान मिळाला.
सर्वजण त्यांना आदराने मामा म्हणतात पण या मामाने कोणाला मामा नाही बनवलं !त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती स्वाभिमानानं जगायला शिकवलं आज त्यांच्या पुण्याईमुळे महाराष्ट्राबरोबरच देशांमध्ये अनेक विद्यार्थी स्वतःच्या कर्तुत्वाने यशाची शिखरे पादक्रांत करताना दिसत आहेत.
आपल्याला माहीत असेल सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर व आत्ताचे नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना सुद्धा मामांचा सहवास मिळाला आहे. पुणे विद्यापिठात असताना अशा अनेक विद्यार्थ्यांना मामानी मदत केल्यामुळे या विद्यार्थ्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे हे वास्तव आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे
“मुझे तो पढे लिखे लोगो ने धोका दिया”
परंतु डी जि कांबळे नक्कीच बाबासाहेबांच्या विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत हे काही कमी नाही.
त्यांनी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात निर्णायक भूमिकी त्यांनी बजावली आहे. मला आठवते आहे माळशिरस तालुक्याची विधानसभा लढवत असताना त्यांनी पैलवानांना कॉम्पुटर भेट दिले कारण पैलवान हा शरीराने व मनाने सदृढ होऊन चमकावा ही त्यांची मनोकामना होती. माझ्याही आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यामध्ये मामाचं मार्गदर्शन महत्वाचे आहे.
त्यांचा एक प्रसंग मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो .मोहोळ तालुक्यात गावगुंडांनीअत्याचार केला होता त्या संदर्भात मी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे लेबर कमिशनर महानवर साहेब यांनी मला वेळोवेळी फोन करून ऑफिसला येण्याची विनंती केली!आमचे मामा,तळवळकर सर व मी सोलापूर ऑफिसला पोहोचलो! आश्चर्य म्हणजे लेबर कमिशनर स्वतःच्या खुर्चीवरून उठून मामाच्या पाया पडले मी हे सर्व बघून मी अवाक झालो.
मला हेे पाहूून विशेष वाटले व
आश्चर्याचा धक्का बसला!
एक
जिल्ह्याचं लेबर कमिशनर असं बोलतो...
मी आज तुमच्यामुळे या खुर्चीत आहे एवढेच काय तर तुकाराम मुंढे साहेब सुद्धा तुमच्या प्रयत्नाचे फलित आहे.यावरून डी जी किती अजब रसायन आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.अशा कर्मयोगी,शिक्षक, सिनेट मेम्बर,आधारस्तंभ मला नेहमी मार्गदर्शक असणारे मामा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐🎂💐🎂
लेखक डॉ.कुमार लोंढे
Mo.9881643650
💝🎁🎊🎁◆Regard●💝🎊💝
💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂🎂💐🎂💐🎂💐🎂
डॉ.कुमार डॉ.पंचशीला ,लोंढे परिवार,सर्व संस्था,गारवाड-चांदापुरी ता.माळशिरस सोलापूर
● CENTRAL HUMAN RIGHT SANGHTAN DELHI
● सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी
● सोशल डेव्हलपमेंट सोसायटी
● KPJS Industries india pvt ltd
● KPJS NAGARI URBAN BANK LTD
● ANKUR CHARITABLE HOSPITAL
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐