अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या अभिनयामुळे कायम चाहत्यांचे मन जिंकत असतो. पण काही दिवसांपासून तो त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच ट्रोल होत आहे. एका व्हिडिओमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवतीवर अपमानजनक, अश्लिल विनोद करताना दिसत आहे. या विनोदावरून युजर्सने त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे.
एका शो दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. त्यात विनोद करत रणदीप म्हणाला, ‘तुम्हाला मी एक ‘डर्टी जोक’ सांगतो.मिस मायावती दोन लहान मुलांसोबत एका गल्लीमधून जात होत्या.तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं, हे दोन्ही मुलं जुळे आहेत का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, नाही, एक ४ वर्षाचा आहे आणि दुसरा ८ वर्षाचा आहे.
त्यानंतर तो माणूस म्हणाला, मला विश्वासच होत नाही की एक व्यक्ती तिथे दोन वेळा जाऊ शकतो.’ असे अपमानजनक वक्तव्य त्याने केले.
सध्या रणदीप हुड्डाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. याच्या या व्हिडीओमुळे रणदीप सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता रणदीपने माफी मागावी, अशी मागणी युजर्स कडून केली जात आहे.