माळशिरस प्रतिनिधी / युवराज नरुटे
माळशिरस तालुक्यतील अन्नधान्य वितरण व्यवस्था व तालुक्याचे पुरवठा अधिकारी जेव्हा कोरोना काळात रेशनिंग चा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारास पाठीशी घालून अशा कोरोना संकट समयी लोकांचे प्रश्न, समस्या सोडवत नसतील तर अशा मग्रूर अधिकाऱ्यांना खुर्चीत बसण्याचा मुळीच अधिकार नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मगरवाडी ता.माळशिरस सोलापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार रेशनचा काळाबाजार करतात अशी माहिती सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांना मिळाली असता त्यांनी आज दि 11/05/21 रोजी सकाळी मंडल अधिकारी जाधव ,पुरवठा विभागाचे वाघमारे,ग्रामसेवक देशमुख सो,तलाठी चव्हाण इ ना हकीकत सांगून घटनास्थळी पंचनामा करण्यास बोलवले यावेळी ग्रामसेवक देशमुख ,उपसरपंच धनाजी मगर,पोलीस पाटील शिवाजी मगर,ग्रामपंचायत सदस्य सिकंदर अत्तार ,माजी सदस्य राघू मगर व सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता मगरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार दुकान न उघडता उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला.
प्रत्यक्षात दुकानाच्या बाहेर आलेला माल ,दुकानाची वेळ,सुट्टीचे दिवस,उपलब्ध साठा , नोंद वही,तक्रार बुक इ सह स्वस्त दुकान एक महिलेच्या नावे असून तिचा पती बड्या शिक्षणसंस्थेत आहे तर प्रत्यक्ष दुकान चालवण्यास उत्तम मगर नावाचा इसम असतो ही सर्व माहिती प्रत्यक्ष दर्शी दिसून आली.त्यामुळे आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही ही मस्तवाल भाषा सदर इसम उत्तम मगर याची आहे.
या संदर्भात पुरवठा विभागाचे अधिकारी वाघमारे यांना हकीकत सांगितली असता हा गेंड्याच्या कातडीचा लोकांच्या पगारावर काम करणारा अधिकारी लोक भावना समजून न घेता वरकरणी कोरोना काळात रेशनच्या काळाबाजार करनाऱ्या दुकानदारास पाठीशी घालून सर्वसामान्य व्यक्तिच्या पोटचा घास हिरावून घेण्याचा महापाप करत आहे.
सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मा.संजय जाधव व माळशिरस तहसीलदार काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे अन्यथा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार समजण्यास हरकर नाही.तालुक्यातील लोक प्रतिनिधी तर नुसते नावालाच आमदार आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारताना दिसत आहे.
“राज्याच्या अन्नधान्य वितरणचे विभागाचे सचिव विलास पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की तालुक्याचे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी योग्य ती कारवाई करतील!”
सदर प्रकरणात योग्य ती कारवाई होणे महत्त्वाचे आहे अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही असा इशारा युवक प्रदिप मगर यांनी दिला आहे.
लोकांच्या प्रश्नास न्याय न मिळाल्यास व तालुक्यातील रेशनचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारास पाठीशी घातल्यास वाघमारे सारख्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यास खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा सर्व ग्रामस्थ व सेंट्रल ह्यूमन राईटचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी दिला आहे. तालुक्यातील रेशन संदर्भात तक्रार असंल्यास सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेच्या पदाधिकारी यांचेशी संपर्क करा असे आवाहन डॉ. कुमार लोंढे यांनी केले आहे . संपर्क 7020400150