देवमाणूस भेटला नि जीव जाता जाता उभा राहिला
/दिघंचीच्या जितकरसरांच्या औषधांची किमया/
(देवराज मोरे, निमसोड सातारा9920790815)
दिघंची/पोपट वाघमारे, पत्रकार
अचानक ताप येतो, नऊ वर्षाचा मुलगा हाॅस्पीटलमध्ये बेशुद्ध अवस्थेतच लुळापांगळा होतो, अगदी मृतावस्थेत जातो, अशा वेळी गव्यसिध्द जितकरसरांच्या(7522944145) औषधांची किमया पुढे चाल करते.पहिल्याच पंधरा दिवसांत मुलगा हातपाय हलवू लागला, पुढच्या पंधरा दिवसांत आणखीन बदल झाला. मुलगा उठून बसू लागला, रांगू लागला, भिंतीला धरुन चालू लागला. वाॅकरवर चालू लागला. आज अडीच महिने झालेवर हा मुलगा स्वतः आता कितीही वेळ चालतोय. जो कसलंच खातपीत नव्हता तो आता दोन चपातीचे जेवण तीन वेळा जेवतोय. मोठ्या हाॅस्पीटलमध्ये मुलाला दाखल केलं. सातारा, सांगली, पुणे हाॅस्पीटल्स झाली. प्रख्यात न्युरोसर्जनने स्पष्ट सांगितले की हा जी. बी. एस. आजार आहे. यामध्ये शरीरातील सर्व नसा सुकतात. यावर जगात उपाय नाही.
मुलाला बरं करण्याची जिद्द देवराज मोरेंना होती. कारण त्यांच्या वारलेल्या मित्राचा हा मुलगा होता. देवराज हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते गणेश मोरे,
शिक्षक बॅन्केचे संचालक चंद्रकांत मोरे, तेथील बाॅक्सर संघटना यांनी पैसा उभा केला. पण विलाजच नाही म्हटल्यावर हे सर्वजण जागच्याजागी ठार गप्प बसले.
असाच एक योग आला. जितकरसर निमसोडला एके दिवशी एकास औषध देणेस गेले होते. रात्र झाल्याने मुलास बघण्याचे त्यांनी टाळत होते. पण गणेश मोरेंनी फार आग्रह केला. पेशंट बघताच सहजच जितकरसर म्हणाले, अगदी शेवटच्या स्टेपला मला या पेशंटसमोर तुम्ही उभे का करत आहात. तुमचा नेमका काय उद्देश आहे? पण सर्वांची एकच मनस्थिती आणि ऐकीव विश्वास होता की, जितकरसरच या मुलास बरे करु शकतात. त्याच क्षणी जितकरसरांनी तीन महिन्यातच या मुलाला बरे करुन दाखवण्याचे चॅलेंज सर्वांसमोरच दिले. आज या मुलाचं पुन्हा शाळेत जाण्याचं भाग्य फळास आलं आहे. मुलगा चौथीत शिकत आहे. त्याचं नाव आहे राजवीर दत्तात्रय घाडगे.सोबत देवराज मोरेंचा फोन नंबर मुद्दाम दिला आहे. आपण प्रत्यक्षच या केसबद्दल विचारु शकता. ही पोस्ट लिहिण्यामागे एकच कारण की रुग्नास त्याचा योग्य दवा भेटला पाहिजे. आणि दवा देणारा देवदूतही!!
शब्दांकन पत्रकार कांतीलाल कारळे