• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

एका हाताने दुष्काळ गाडणारा ८० वर्षांचा ढाण्या वाघ

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 5, 2021
in महाराष्ट्र
0
एका हाताने दुष्काळ गाडणारा ८० वर्षांचा ढाण्या वाघ

एका हाताने दुष्काळ गाडणारा ८० वर्षांचा ढाण्या वाघ

लातूर: लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं 1972 आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ८० वर्षाचा हा शेतकरी एका हातावर 45 वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो. स्वत:च्या कष्टावर निव्वळ शेतीतून साम्राज्य उभ्या केलेल्या या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना आवाहन आहे. आत्महत्येचा विचार जरी मनात आला तर फक्त एकदा माझ्याकडं या, तुमचे विचार गळून पडतील.

महादेवअप्पा चिद्रे…अपघातात खांद्यापासून एक हात गमावलाय. पण जिद्दीच्या जोरावर…45 वर्षाच्या सरावानं, एक हाताने हे काय काय करत नाही, तेही विना अपघात..

बुलेट…चार चाकी..ट्रॅक्टर…घोड्यावर रपेट ही कामं महादेवअप्पा सहज करतात. ८० वर्षाच्या अप्पांना आजही ओव्हर टेक करून कोणीही पुढं गेल्याचं चालत नाही.अप्पांचं गाव लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं दवणहिप्परगा. कुस्ती खेळताना अप्पांचा हात मोडला. त्या वर्षी 72 चा तीव्र दुष्काळ होता. अचानक वडील वारले. आई एकटी. घरात पाच बहिणी. डॉक्टरांनी हात खांद्यापासून काढून टाकला. पीढीजात 40 एकर शेतात गवत आणि झाडं-झुडपं होती. अशावेळी अप्पा खचले नाहीत. हातात कुदळ घेतली..एका हाताचे चार हाथ केले..

दुष्काळ पराभूत करण्यासाठी हा गडी 1972 पासून सात वर्षे गावच्या वेशीत शिरला नाही. हात गमावल्याची लाज मनात होतीच. हळूहळू अप्पांनी स्वहस्ते सगळीच्या सगळी जमिन वहिवाटीत आणली.
अप्पा शेतीला वळण देत होते. त्या काळात दर तीन-चार वर्षानंतर नापिकी व्हायची. घरची जबाबदारी वाढत होती. पण अप्पांची एकच जिद्द, काहीही झालं तरी शेतं सोडून जायचं नाही. आत्महत्येचा विचारही मनात येवू द्यायचा नाही.

45 वर्षात अप्पांनी 150 एकर शेती नेली. आपल्या बरोबर सालगड्यालाही 10 एकर जमीन घेवून दिली. बुलेट, ट्रॅक्टर, ट्रक, नव-नव्या ब्रँडची चार चाकी वाहने खरेदी केली. कंत्राटाची छोटी-मोठी कामे केली. शेतात देखणा बैलबारदाणा केला. या काळात अप्पांनी एकच पथ्य पाळलं. गावात चकाट्या पिटत बसायचं नाही. राजकारणात सहभाग नको. मित्रांनाही भेटायचं असेल तर शेतावरच्या घरी यायंच.
अप्पांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सगळे दुष्काळ पराभूत केलेत. या वर्षीच्या दुष्काळातही अप्पांना साडेतीनशे पोती तूर..100 पोती सोयाबीन पिकवलंय. विहिरीच्या थोड्याशा पाण्याचा नेटका वापर करून पाच एकर डाळिंबाची बाग जोपासली आहे.

अप्पांची तीनही मुलं शिकली नाहीत..पण एक नातू इंजिनिअर..एक डॉक्टर आणि शिक्षक झाला आहे.

शेती आणि जिवनातल्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी पंचक्रोशीतले लोक महादेवअप्पाच्या घरी येतात. अप्पांनी कहाणी सांगणारी पत्रकं तयार करुन लोकांनी स्वत: पंचक्रोशीत वाटलीत.

खचलेल्या शेतकऱ्यांना आप्पा म्हणतात, ‘जर का तुम्हाला आत्महत्या करावी वाटली, तशी बुद्धी सुचली, तर मला येवून भेटा, तुमच्या शंकांचं निवारण करतो, अशी माझी खात्री आहे.’

अप्पांना राज्य सरकारनं शेती निष्ठ पुरुस्कार दिला आहे. आपल्या अनुभवांवर अधारित अप्पांचा शेतक-यांना संदेश आहे. नापिकीमुळ आत्महत्या होत नाही. अधिर मन अवसानघात करतं, त्यामुळं आत्महत्येचा विचार जरी मनात आला तरी फक्त एकदा या एक हाताच्या माणसाच्या शेतावर या. तुमचे आत्महत्येचे विचार गळून पडतील.
साभार FB (manoj )

Tags: DessertLaturPuneSolapurयशोगाथा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
राधिका कांबळे यांच्यावर अन्याय व अत्याचार प्रकरण – बहुजन संघाचे गणेश देवकते यांचे अधीक्षक यांना निवेदन

राधिका कांबळे यांच्यावर अन्याय व अत्याचार प्रकरण - बहुजन संघाचे गणेश देवकते यांचे अधीक्षक यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .