निरा नरसिंहपुर: दिनांक- 2,
विशेष प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंह पूर येथे श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सव हा श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट आणि श्री लक्ष्मी नरसिंह यात्रा कमिटी निरा नरसिंहपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असतो सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री नरसिंह जयंती नवरात्री उत्सव हा शनिवार दिनांक 3 मे 2025 पासून सुरू होणार आहे. या जयंती उत्सवामध्ये दररोज सकाळी 6.00 ते6.30 सनई चौघडा वादन, सकाळी 7.00 ते 7.30 विष्णूसहस्त्रनाम, सकाळी8.00 ते 9.00 पंचामृत, दुपारी 11.30 ते 12.30 महानैवेद्य आरती होईल.

वैशाख शु.6. शनिवार,3 मे 2025 10 ते 11.30 भजनी मंडळ समस्त निरा नरसिंहपुर शेवरे, टणु ,संगम ,गिरवी, बाभुळगाव व इतर 12.00 ते 2.00 महानैवेद्य किंवा आरती 2.00 ते 3.30 सुगम भक्ती संगीत प्राध्यापक राजश्री ओक पुणे . 4 ते 5 प्रवचन ह. भ .प. श्री .बाळासाहेब देवकर पंढरपूर (श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज), 5.30 ते 7.30 कुचीपुडी श्रद्धा पाटील, प्रांजली खांडेकर, सृष्टी चालकापूरकर, हैदराबाद. 9 ते 11 कीर्तन ह. भ. प. श्रीपाद बुवा लिंबेकर.
वैशाख शु.7. वार रविवार दिनांक 4 मे 2025 .10 ते 11 भजनी मंडळ श्रीराम भजनी मंडळ सोलापूर. 12.00 ते 2.00 महानैवैद्य किंवा आरती 2.00 ते 3.30सुगम भक्ती संगीत. शनिवार संगीत मंडळ धाराशिव . 4.00 ते 5.00 प्रवचन ह.भ.प .श्री. माधव श्रीकांत किल्लेदार पुणे. 5.30 ते 7.30 सुगम भक्ती संगीत श्री आशिष केसकर व परिवार . 9.00 ते 11 कीर्तन ह.भ. प. श्री. चिन्मय विवेक देशपांडे पुणे.
वैशाख शु.8 वार सोमवार दिनांक 5 मे 2025. 10.00 ते 11.30 भजनी मंडळ . स्वरेषा पोरे-कुलकर्णी. 12.00 ते 2.00 महानैवेद्य किंवा आरती 2.00ते 3.30 अभंगवाणी अजय देशपांडे व सौ स्नेहा फडणीस कोल्हापूर. 4.00 ते 5.00 प्रवचन ह. भ. प .श्री.एकनाथ शाहूराज पाटील मेंढेकर. 5.30 ते 7.30 सुगम भक्ती संगीत रसिका व सानिका कुलकर्णी सोलापूर. 9.00 ते 11.00 कीर्तन ह. भ. प .श्री.राघवेंद्र देशपांडे.
वैशाख शु.9. मंगळवार दिनांक 6 मे 2025. 10.00 ते 11.30 भजनी मंडळ आसावरी भजनी मंडळ पंढरपूर. 12.00 ते 2.00 महानैवैद्य किंवा आरती.2.00 ते 3.30 सुगम भक्ती संगीत सार्थक राजेश बावीकर सोलापूर. 4.00 ते 5.00 प्रवचन श्री. धनंजय दत्तात्रय दुनाखे (निरा नरसिंहपुर). 5.30 ते 7.30 सुगम भक्तिसंगित सौ भक्ती पागे, कु. रावी पागे व राजेंद्र दीक्षित पुणे. 9 ते 11 कीर्तन ह .भ .प. श्री. आनंद काकडे निरा नरसिंहपुर.
वैशाख शु.10 वार बुधवार दिनांक 7 मे 2025. 10.00 ते 11.30 भजन मंडळ रामकृष्ण परमहंस भजनी मंडळ फलटण. 12.00 ते 2.00 महानैवैद्य किंवा आरती. 2.00 ते 3.30 सुगम भक्ती संगीत नादब्रह्म श्रीपुर निर्मित भाव सरगम.4.00 ते 5.00 प्रवचन पंडित विद्यानिधी आचार्य सोलापूर . 5.30 ते 7.30 भक्ती गीत सुकन्या व सौ सुप्रिया दंडवते, सौ ऋतुजा भाले . 9.00 ते 11.00 कीर्तन ह. भ. प. सौ. स्मिता प्रभाकर आजेगावकर ,पुणे.
वैशाख शु.11 वार गुरुवार दिनांक 8 मे 2025. 10.00 ते 11.30 कथक नृत्य अपूर्वा प्रभुणे, ओवी देशपांडे, मही कुलकर्णी. 12.00 ते 2.00 महानैवैद्य किंवा आरती. 2.00 ते 3.30 सुगम भक्तिसंगित अनिरुद्ध धर्माधिकारी(अहिल्यानगर), 4.00 ते 5.00 प्रवचन ह. भ. प .श्री. पद्मनाभ व्यास श्रीक्षेत्र तेर. 5.30 ते 7.30 भावगीत/ भक्तीगीत उदय भवाळकर पुणे . 9.00 ते 11.00 कीर्तन ह.भ .प .श्री. लक्ष्मीप्रसाद पटवारी माजलगाव( बीड).
वैशाख शु.12 वार शुक्रवार दिनांक 9 मे 2025. 10.00 ते 11.30 भजन मंडळ रेणुका बसली मंडळ सोलापूर. 12.00 ते 2.00 महानैवैद्य किंवा आरती. 2.00 ते 3.30 भावगीत किंवा भक्ती गीत श्री रमाकांत चाटी (नांदेड). 4.00 ते 5.00 प्रवचन डॉ. श्री प्रशांत अनंत सुरू (पुणे ). 5.30 ते7.30 सुगम भक्ती संगीत श्री. अनिरुद्ध जोशी व सौ. रसिका जोशी (मुंबई ). 9.00 ते 11.00 कीर्तन ह.भ. प .श्री. ज्ञानेश धानोरकर.
वैशाख शु. 13 वार शनिवार दिनांक 10 मे 2025. 10.00 ते 11.30 बासरी वादन श्री. नंदकुमार डिंगरे (पंढरपूर). 12.00 ते 2.00 महानैवैद्य किंवा आरती. 2.00ते 3.30 भक्तिसंध्या श्री. गिरीश रघुनाथ कुलकर्णी सोलापूर. 4.00 ते 5.00 प्रवचन ह.भ. प .श्री. चातुर्मासे महाराज (पंढरपूर). 5.30 ते 7.30 भावगीत श्री शेखर कुंभोजकर व सौ मेधा कुंभोजकर( पुणे). 9.00 ते 11.00 कीर्तन ह. भ. प. श्री .प्रणव जोशी (पुणे).
वैशाख शु 14 वार रविवार दिनांक 11 मे 2025. 10.00 ते 11.30 भक्ती गीत समर्थभक्त श्री अजित गोसावी महाराज (पुणे) 2.00 ते 3.00 प्रवचन ह.भ .प .श्री. मोहनबुवा रामदासी . 4.30 ते 7.00 नरसिंह जयंती कीर्तन ह .भ. प .श्री. संदीप मांडके (पुणे).
वैशाख शुद्ध पौर्णिमा सोमवार दिनांक 12 मे 2025 रात्री 9.00 वाजता छबिना श्री पालखी मिरवणूक.
वैशाख शुद्ध पौर्णिमा मंगळवार दिनांक 13 मे 2025 सकाळी 10.00 ते 12.00 काल्याचे किर्तन ह.भ. प .श्री .अंकुश सुखदेव रणखांबे महाराज (नीरा नरसिंहपुर). हार्मोनियम सात श्री गंगाधर देव पुणे तबला सात श्री दिनकर गोसावी इंदापूर.
श्री लक्ष्मी नरसिंह यात्रा कमिटी 2025 निरा नरसिंहपुर चे अध्यक्ष श्री. राजेंद्र मोरे, उपाध्यक्ष अण्णा जगताप, उमेश घोडके, सरपंच नितीनजी सरवदे, उपसरपंच श्री पप्पू गोसावी, ग्रामसेवक बाळासाहेब वाघमोडे, डॉक्टर संदीप केसकर, माजी उपसरपंच विठ्ठल काका देशमुख, प्रशांत बादले पाटील, माजी सरपंच चंद्रकांत सरवदे,वस्ताद सचिन कदम यांचे सहकार्य लाभले.
दिनांक 3 मे 2025 ते 11 मे 2025 वेदपठण सकाळी 11.30 वाजता श्री लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळा नीरा नरसिंहपुर.
मंगळवार दिनांक 6 मे 2025 रोजी जे एफ अजमेरा व नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब धाराशिव व श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दंत व डोळे तपासणी शिबिर श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट कडून मोफत चष्मे वाटप. स्थळ- पश्चिम दरवाजा धर्मशाळा.
याचा सर्व नरसिंह भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान मुख्य विश्वस्त व विश्वस्त मंडळ श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र नरसिंहपुर, समस्त, त्रिवर्ग व ब्रह्मवृंद निरा नरसिंहपुर, सरपंच , ग्रामपंचायत व ग्रामस्थ श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपुर यांनी केले आहे.