मोडनिंब ग्रामपंचायत मध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मीताई पाटील आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास दादा तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच अमित कोळी, आर.पी.आय.चे संघटक नागनाथ ओहोळ, माजी सरपंच चांगदेव वरवडे ,ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, दत्ता सुर्वे, संतोष पाटील सर, किरण खडके, संजीव शिंदे, किरण तोडकर ,सदाशिव पाटोळे, अतुल गाडे ,कुंभार सर ,नवनाथ मोहिते, विजय खेलबुडे, सुधीर गुळवे ,राजेश पाटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
