• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे : अजमेर शरीफ दर्गाहचे डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांचे प्रतिपादन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 10, 2025
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक- 10 ,

प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

परम पूज्य राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी अध्यात्मिक कार्या बरोबरच समता, विश्वबंधुत्व आणि सदाचरण केंद्रबिंदू मानून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या कार्याचा वारसा संवर्धित करण्या साठी सर्वांनी कालबद्ध योगदान द्यावे असे आवाहन अजमेर शरीफ दर्गाह चे डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांनी केले.इंदापूर येथील श्री दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट आश्रमात भय्युजी महाराज यांच्या भक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भय्युजी महाराज हे मला मोठे भाऊ म्हणून बाबासाहेब या नावाने बोलत असत असे स्पष्ट करून इंदूर ते इंदापूर नाते विशद करत भय्युजी महाराज यांचे इंदापूर येथील सर्व संकल्पित प्रकल्प राबविण्याचे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी भय्यूजी महाराज यांच्या आठवणीमुळे सर्वजण भावनाप्रधान झाले होते. यावेळी डॉ. उस्मानी यांचा दिलीप वाघमारे तर इंदापूर आश्रमासाठी जागा दिलेले गोरख शिंदे यांचा डॉ. उस्मानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी पुढे म्हणाले, भय्यूजी महाराज हे अखिल प्राणी मात्र यांच्यासाठी केलेल्या कार्यामुळे अमर आहेत. त्यांनी पर्यावरण संतुलन, दुष्काळ निवारण करण्यासाठी गाव तिथे तळे, गरीब मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपक्रम, एचआयव्ही बाधित युवापिढी साठी आश्रम, मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी प्रकल्प, गरीब मुलींची लग्ने यासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या सर्व कार्याचा आदर्श आपण पुढे नेणे ही काळाची गरज आहे. भय्यूजी महाराज यांनी स्थापन केलेल्या इंदापूर आश्रमाचे व्यवस्थापन चांगले असून गुरु गादीची निरंतर सेवा करत रहा असा संदेश त्यांनी दिला. इंदापूर भक्तांच्या आग्रहास्तव आपण इंदापूर गुरुपौर्णिमा उत्सवासाठी निश्चित येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पुणे येथील डॉ. प्रशांत देशमुख म्हणाले, सद्गुरु भय्यूजी महाराज आणि अजमेर शरीफ चे संत डाॅ. श्री. पीर सईद इरफान मोईन उस्मानी बाबा या दोघांमध्ये जिवश्चकंठश्च स्नेह होता. भारतातील विविध शहरात त्यांनी विविध धर्म, पंथांच्या धार्मिक, सार्वजनिक, सामाजिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करून भारतीय संस्कृती संवर्धित केली. त्यांनी जगाला प्रेम, सद्भावना, शांती व मानवतेचा संदेश दिला. त्यामुळे गुरुसेवा व गुरुतत्व केंद्रबिंदू मानून सर्वांनी त्यांचे कार्य जोमाने पुढे चालवावे असे आवाहन केले. यावेळी हरीश पाटील, हिंजवडीचे उद्योजक सूर्यकांत साखरे पाटील, राजेंद्र पवार, प्रदीप पवार, सुनील बनसुडे, तैय्यब शेख, सलीम बागवान, अंगद तावरे, डॉ. संतोष नगरे, सतीश कस्तुरे, दीपक चौधरी, सुभाष पानसरे तसेच शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्वागत बसवेश्वर लंगोटे, अनिल परदेशी यांनी तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन अरूण चव्हाण यांनी केले. आभार दिलीप वाघमारे यांनी मानले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त नीरा नरसिंहपूर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .