निरा नरसिंहपुर: दिनांक- 10 ,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पुणे येथे संयोग फिल्म प्रोडक्शन अँड एंटरटेनमेंटची निर्मिती करत असलेला मराठी चित्रपट “उधाण” एक प्रेम कथा या चित्रपटाचा शुभ मुहूर्त पार पडला ही कहाणी एक वेगळ्याच धरतीवरती लिहिली गेलेली आहे लोकांना ती नक्कीच आवडेल असे चित्रपटाच्या लेखिका व निर्माती सौ योगिता संतोष शिरसाट यांचे आहे तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम गणेश जोशी हे पाहत आहेत गीतकार बी भूषण विशाल वाघ रामेश्वर साळुंखे या चित्रपटासाठी तीन संगीतकार निखिल महामुनी विशाल वाघ रामेश्वर साळुंखे हे एकत्र येऊन काम पाहत आहेत म्युझिक अरेंजिंग चे काम हे एकटे निखिल महामुनी हे पाहत आहेत कॅमेरामन जितेंद्र आचरेकर कार्यकारी निर्माता उमेश साळगावकर सचिन माळवदे हे पाहत आहेत या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक व इतर चित्रित होणार आहे या चित्रपटाच्या कलाकार व गायक यासंदर्भात सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे या चित्रपटाची चित्रीकरण एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे बिग बजेट असलेला हा चित्रपट भारत व भारताच्या बाहेर परदेशात सुद्धा प्रदर्शित करण्यात येणार आहे असे म्हणणे योगिता शिरसाट यांचे आहे व शुभ आशीर्वाद मिळो अशी इच्छा त्यांनी यावेळी केली.
संयोग फिल्म प्रॉडकशन & एंटरटेनमेंट मराठी चित्रपट उधाण निर्माती – योगिता शिरसाट दिग्दर्शक – गणेश जोशी संगीतकार – निखिल महामुनी, विशाल वाघ, रामेश्वर साळुंखे गीतकार – बी. भूषण, विशाल वाघ, रामेश्वर साळुंखेकथा – योगिता शिरसाटDOP – जितेंद्र आचरेकर EP- उमेश साळगावकर प्रोडक्शन मॅनेजर – सचिन माळवदे.
