सामायिक व्यवसाय असक्रमासाठी असणारी एम एच सी ई टी MH-CET नोंदणी प्रक्रिया पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे मार्च महिन्यामध्ये साधारणपणे या परीक्षा असतात त्याची पूर्व तयारी करण्यासाठी आता भरपूर वेळ असतो.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून १९ व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यात कला विभाग, तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्यास अवधी मिळावा यासाठी २७ नोव्हेंबर रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १६ मार्च ते २७ एप्रिल २०२५ या ४५ दिवसांच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत.
या सामाईक परीक्षेसाठी आपण विद्यार्थ्यां व पालकांनी सी ई टी सेल ची वेबसाईट पहावी . अधिकृत माहिती पाहून त्यानुसार नोंदणी प्रक्रिया करून घ्यावी होणारा विलंब आपण टाळावा..