प्रतिनिधी ,
मोडनिंब मध्ये अभिजीत आबा चषक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.यामध्ये प्रथम पारितोषिक मुन्ना राजे मोरे संघाने पटकावले, द्वितीय पारितोषिक वैभव आणा मोरे तर तृतीय पारितोषिक मुंबई इंडियन्स संघाने पटकावले.
अंतिम सामना पाहण्यासाठी विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील आवर्जून उपस्थित राहिले होते. तसेच त्यांच्या समवेत सचिन वाघाटे साहेब ,भाऊसाहेब महाडिक तसेच मोडनिंब गावचे सरपंच माजी सरपंच बाबू तात्या सुर्वे ,गुरुवर्य लोकरे सर, आत्तार साहेब, दिपक आबा सुर्वे ,किशोर नाना डावरे ,पवन जगताप ,अमित बापू ,चेअरमन मोरे ,सुहास चव्हाण, सुशांत गायकवाड साहेब, अमोल आपा थोरात ,रोहित आबा गडेकर, ज्ञानेश्वर लादे ठेकेदार बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निखिल निचाळ, सागर नलावडे ,पप्पू शेंडगे यांनी परिश्रम घेतले व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
