इंदापूर प्रतिनिधी,
आज इंदापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये बी.के.पी. मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील यांनी सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या निवडी जाहीर केल्या.
या निवडीच्या कार्यक्रमासाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित राहिले होते.
बी.के.पी.मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी किशोरजी ओहोळ तर कार्याध्यक्षपदी प्रा. सदानंद बनसोडे व सोलापूर जिल्हा सचिव पदी दत्तात्रय ओहोळ यांची बिन विरोध निवड करण्यात आली.
बी.के.पी मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, उपाध्यक्षपदी सतीश जगताप ,सचिव पदी शंकर बोडके तसेच कार्याध्यक्षपदी ऋषिकेश दळवी यांच्या निवडी करण्यात आल्या.
बी.के.पी. मराठी पत्रकार संघाच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, हार, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भवि कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी बी.के.पी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील ,शंकर बोडके, सलीम शेख, सतीश जगताप, धनंजय शेंडगे, अशोक घोडके,प्रा.ऋषिकेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

