प्रतिनिधी,
दि.22.09.2024 रोजी ऑल इंडिया शातोकॉन कराटे ऑर्गनायजेशन यांच्या माध्यमातून पारगाव,ता.दौड.जि.पूणे या ठिकाणी कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षेत कु. गार्गी हनुमंत लोंढे हिने प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल मिळवले.
सदरील ठिकाणी सुधाकर शेलार , आकाश म्हस्के ,विलास जाधव ,सौ.शुभांगी लोंढे मॅडम,सचिन यादव,रवींद्र पवार, इत्यादी पालक उपस्थित होते.
मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे असल्याचे कराटे प्रशिक्षक नारायण रुपनवर सर यांनी सांगितले.
