वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी २१/०८/२०२४ च्या सर्व आंबेडकरी पक्षाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडी माढा तालुका व कुर्डुवाडी शहराच्या वतीने पोलिस निरीक्षक कुर्डुवाडी यांना निवेदन दिले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली काढून महापूरुष्यांच्या नावाने घोषणा दिल्या.
सदर कुर्डुवाडी बंद साठी माढा तालुका युवा अध्यक्ष जितू(भाऊ)गायकवाड, यांनी पुढाकर घेतला. युवा तालुका उपाध्यक्ष अभिमान गायकवाड,एम.डी.साबळे, विनोद (एक्का) सोनवणे, दयानंद जानराव, अमोल सुतकर, शहराचे युवा शहराध्यक्ष कृष्णा हजारे, शहराचे सहसचिव भीमा माने, शहराचे प्रसिध्दी प्रमुख यश गायगवळी, शहर संघटक करण वाघमारे, सह वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या घोषणांनी संपूर्ण शहर वंचितमय झाले होते, न्यायालयाला एस.सी,एस.टी आरक्षनाच्या वर्गीकरणा बाबत हस्तक्षेप करता येणार नाही हे घटनेत नमूद असताना सुद्धा राजकीय दबावापोटी वर्गिकरणाचा न्यायालयाने घेतलेला निर्णय हा समाजावर अन्याय करणारा आहे आम्ही त्या निर्णयाचा निषेध करतो असे तालुका अध्यक्ष जीतू (भाऊ)गायकवाड यांनी सांगितले तर ,कुर्डूवाडी शहर१००% बंद मध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे अभार शहराचे शहराध्यक्ष प्रदिप (पॅडी) सोनटक्के यांनी मानले.


