प्रतिनिधी,
रोटरी क्लब ऑफ मोडनिंब 2024/25 चा पदग्रहण समारंभ मंगळवारी सायंकाळी सात वाजता अतिशय जल्लोषात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रो. पी डी जी मोहन देशपांडे तसेच प्रमुख पाहुणे ए. जी. ऍड. विकास बेले, रो. आनंद कानडे व मोडनिंब च्या सरपंच लक्ष्मीबाई पाटील होते.
सर्वप्रथम मागील अध्यक्ष औदुंबर पाटील व सचिव रो. डॉ. सुहास खडके यांनी मागील वर्षाचा आढावा लोकांसमोर मांडला, त्यानंतर यावर्षीचे अध्यक्ष रोटरी डॉ.संतोष दळवी, व सचिव सुनील रेपाळ यांच्याकडे पदभार सोपवला, नवीन अध्यक्ष संतोष दळवी व सचिव सुनील रेपाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी चार्टर प्रधान करून पदभार दिला.
नवीन अध्यक्ष रो. डॉ. संतोष दळवी यांनी रोटीचा प्रोटोकॉल सांभाळून वॉटर कन्सर्वेशन व वृक्षारोपण, व जैविक शेती यावर जास्त भर देणार असल्याचे सांगितले, त्यानंतर रो. आनंद कानडे यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर आपले मनोगत व्यक्त केले, रो. ए जी विकास बेले यांनी डीजी चा मेसेज क्लब पुढे व जनतेपुढे मांडला, शेवटी सचिव सुनील रेपाळ यांनी सर्वांचे आभार मानले, त्यानंतर सर्वांनी मनसोक्तपणे सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, जिल्हा परिषद चे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी नाना कांबळे, राष्ट्रवादीचे माढा तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी, मोडनिंब चे माजी सरपंच बाबुतात्या सुर्वे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत आबा गिड्डे, अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दत्ता बापू सुर्वे व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, माढा, कुर्डूवाडी, टेंभुर्णी तसेच सांगोला रोटरी क्लबचे सदस्य बहुसंख्येने हजर होते.

