प्रतिनिधी,
बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय मा.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी सुरू केलेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून कुर्डूवाडी तालुका माढा येथे आज सन्माननीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षण बचाव यात्रेची कॉर्नर सभा पार पडली.
त्यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी कुर्डूवाडी शहर व माढा तालुक्याच्या वतीने साहेबांचा आदर सत्कार करण्यात आला ढोल ताशांच्या गजरामध्ये कुर्डूवाडी शहराच्या वतीने साहेबांचे वाजत गाजत कॉर्नर सभेच्या ठिकाणी जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन झाले आपल्या भाषणामध्ये आंबेडकर साहेबांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर बोलताना मराठा समाज व ओबीसी समाज या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरज आहे परंतु राज्यातील आणि केंद्रातील सरकार हा वाद मिटवून टाकण्यापेक्षा या गोष्टीचे राजकीय भांडवल करून जाणून-बुजून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे जोपर्यंत प्रस्थापित मराठ्यांचे राजकीय पक्ष आपली भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत आपण आपलं आरक्षण वाचवण्यासाठी कुठेही कमी पडता कामा नये, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल असा मार्गदर्शन पर सल्ला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित बांधवांना दिला.
सदर कार्यक्रमास माढा लोकसभा जिल्हाध्यक्ष युवा आघाडी साहेबराव वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन सरवदे,कुर्डूवाडी शहराचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप (पॅडी) सोनटक्के, वंचित बहुजन आघाडी माजी माढा तालुका अध्यक्ष एम.डी.साबळे, तालुक्याचे नेते विनोद (एक्का)सोनवणे,नूतन युवक माढा तालुका अध्यक्ष जितू (भाऊ) गायकवाड , तालुका उपाध्यक्ष अभिमान गायकवाड,कुर्डूवाडी शहराचे युवा शहराध्यक्ष कृष्णा हजारे सह कुर्डूवाडी तसेच परिसरातील ओबीसी नेते मेजर हंबीरराव गोरे, मुन्ना अनंतकवळस, सागर कोल्हे, अप्पा मोरे, सह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
