माळशिरस तालुक्यातील (सोलापूर) ग्रामीण भागातील सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज ही शिक्षण संस्था शिस्त,गुणवत्ता व निकाल या बाबतीत अग्रेसर ठरत आहे.सैनिकी,स्पर्धा परीक्षा,एन.एम.एम.एस,शिष्यवृत्ती, नवोदय सारख्या परीक्षेत सुद्धा विद्यार्थी चमकत आहेत.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकूण ४४ मुले दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाली होती.प्रथम क्रमांक कु.मदने प्रशांत सुनील(७९.४०), द्वितीय क्रमांक कु.जाडकर किरण बाळासाहेब (७५.००),तृतीय क्रमांक कु.सय्यद रिहान पैगंमबर (७३.२०)तर मुलींमध्ये कु.काकडे दुर्गा विजय (८२.००) इ नी नंबर मिळवले.
०८ मुले विशेष प्रविण्यासह,२८ मुले प्रथम श्रेणीत तर द्वितीत श्रेणीत ०६ मुले उत्तीर्ण झाली आहेत.दहावीचा निकाल ९५.४५% लागला आहे.सदर विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रा.आर वायदंडे,डॉ.पंचशीला लोंढे,प्रा.ए.पठाण,प्रा.डी.कारंडे, प्रा.एन.सरक,प्रा. व्ही. देवकाते,अरुणा मॅडम,काळे मॅडम इ नी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल विद्यार्थी,पालक व प्राध्यापक यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ.कुमार लोंढे संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे शाळा समितीचे अध्यक्ष गोविंद कांबळे जितेंद्र देठे,बाळासाहेब जाडकर इ नी केले.
