निरा नरसिंहपुर: दिनांक-26,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यातील मौजे टनु तालुका इंदापूर, जिल्हा पुणे , या गावांमध्ये पाचही लोक इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यूच्या दाढेतून एक जणांनी वाचवलेत.
सविस्तर वृत्तांत असा की टनु या ठिकाणी पप्पू सुरेश जगताप, अरुण नारायण जगताप, सोनाली पप्पू जगताप, स्वप्नाली सचिन जगताप, परी सचिन जगताप ,अशा लोकांचा समावेश होता.
धुणं वाळू टाकण्यासाठी जोडण्यात आलेल्या तारेला घरातील इलेक्ट्रिक वायरचा स्पर्श झाल्यामुळे अंगणात असणाऱ्या धुनीवाळू टाकण्यासाठी च्या तारेने पाचही लोकांना इलेक्ट्रिक शॉक बसलेला होता.
परंतु प्रसंगावधान राखून व झालेला गोंधळ पाहून प्रशांत बापूराव जगताप या वीस वर्षे युवकाने कशाचाही विचार न करता सदरील घटनेचे प्रसंग पाहून तात्काळ वायर ओढून सर्व इलेक्ट्रिक सप्लाय बंद केली. यामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पाचही लोकांचे प्राण त्यांनी वाचले यामुळे परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
