माळशिरस तालुक्यातील (सोलापूर) चांदापुरी येथील सोशल संस्था संचलित सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज इ बारावी फेब्रु/मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचा सर्व विभागाचा कला,विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला आहे.
विद्यार्थी गुणवत्ता, नवोदय, शिष्यवृत्ती,NMMS, TI, NEET, JEE, MH-CET,मेडिकल,फार्मसी,हॉटेल मॅनेजमेंट अगदी सर्वच क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडत आहेत.सलग आठव्या वर्षी संस्थेचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे पुन्हा एकदा गुणवत्ता व विद्यार्थी घडवण्याची हमी सिद्ध झाली आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 117 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.
कला विभागात प्रथम क्रमांक सरतापे शिवाणी पितांबर (71.83%)
द्वितीय क्रमांक साठे प्रथमेश बाळासाहेब (66.00%) तृतीय क्रमांक
मगर चंदना भागवत (64.50%) विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक
गोंजारी शुभम राजेंद्र (71.83%) द्वितीय क्रमांक गोरवे श्रुष्टी मसू (71.33%) तृतीय क्रमांक देठे अक्षता जितेंद्र (66.50%) तर वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक वाकडे स्नेहा हरी (60.33%) द्वितीय क्रमांक खुडे वैभव नामदेव (57.67) तृतीय क्रमांक आदाटे अथर्व राजेश (52.33) असे गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत तर (17 नंबर) खाजगी विद्यार्थी सर्व शाखांचा निकाल सुद्धा 100% लागला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे,शाळा समितीचे गोविंद कांबळे,जितेंद्र देठे,बाळासो जाडकर, सचिव डॉ. पंचशीला लोंढे,प्राचार्य,विभागप्रमुख प्रा. राजेश वायदंडे,प्रा.डी.कारंडे,प्रा.नितीन सरक,प्रा.ए पठाण,काळे मॅडम,अरुणा मॅडम, प्रा.व्ही देवकाते इ नी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.परिसरातील ग्रामस्थ ,मान्यवर ,सरपंच उपसरपंच,शाळेचे हितचिंतक व सर्व स्तरातून संस्थेवर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.