कोल्हापूर प्रतिनिधी –
रायगड जिल्ह्यात कमी वयामध्ये उद्योग जगतामध्ये रियल इस्टेटमध्ये आणि हॉटेलिंग व्यवसायामध्ये उद्योगाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार देऊन वंचितांचे शोषितांचे कामगारांचे व कष्टकऱ्यांचे हित जोपासणारे सेंट्रल हुमान राईट संघटन दिल्ली चे नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर चेतन कोंडे हे युवकांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.
कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज ,सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली चे नॅशनल प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते महात्मा फुले युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन चेतन कोंडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रीय उपाध्यक्ष व भारतभूषण पुरस्कार प्राप्त ऍड एम जी तांबोळी,प. महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.के के कुंभार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. वापिलकर,सागर गुरव सौ. कलकुटकी ई मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या कार्य बेधडक आणि कर्तृत्ववान कार्यशैली असल्या कारणाने सेंट्रल ह्युमन राइट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे यांनी त्यांचे या वर्षीच्या महात्मा फुले युवा उद्योजकता पुरस्कारासाठी शिफारस केली.
हा पुरस्कार सोशल डेव्हलपमेंट सोसायटी सदाशिवराव देठे निवासी प्रशाला ज्युनिअर कॉलेज चांदापुरी सेंट्रल ह्युमन राइट संघटन दिल्ली या सर्व संस्थांच्या वतीने जर त्यावर्षी दिला जातो. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
2016 पासून ते आजपर्यंत समाजातील फुले, शाहू ,शिवराय व समतेचा विचार घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना असे पुरस्कार वितरित केले जातात या पुरस्कारासाठी कोणतेही मानधन अथवा कोणतीही फी न आकारता ज्यांचे समाजामध्ये चांगले काम आहे अशांनाच या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो या पुरस्काराच्या निवडीबद्दल चेतन कोंडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होतो आहे.सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली च्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळणे ही कार्याची पोचपावती आहे


