सेंट्रल ह्युमन राईट संघटन 2016 पासून देशात व राज्यात विविध ठिकाणी मानव अधिकार,हक्क व अधिकाराची लढाई लढत आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यात व जिल्ह्यातील बारा तालुक्यात कार्यरत आहे

सामाजिक समतेच्या विचारासाठी व लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांचे समतेचे विचाराचे वारसदार असणारे शाहू महाराज यांना सेंट्रल ह्युमन राईट चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे नॅशनल चे व्हा.प्रेसिडेंट ऍड एम जी तांबोळी, नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर चेतन कोंडे देशमुख ,पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर के के कुंभार ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर वापीलकर व कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील तालुकाध्यक्ष या सर्वांच्या वतीने अधिकृत सहीचे जाहीर पाठिंबा अधिकृत पत्र छत्रपती शाहू महाराजांना देण्यात आले
यावेळी महाराजांनी संघटनेच्या कामाचं कौतुक करून जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल विविध विषयावर सविस्तरपणे चर्चा करून मनमोकळ्या गप्पा केल्या आणि भरपूर वेळ दिला. आदरणीय शाहू महाराजांच्या विजयासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सेंट्रल ह्युमन राईट चे नॅशनल प्रेसिडेंट डॉ.लोंढे यांनी आदेश दिले असून सर्व कार्यकर्त्यांना परिश्रम करून महाराजांना निवडून आणण्यासाठी आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आघाडीच्या सविता कलकोटी, तालुका अध्यक्ष सागर गुरव ई सह अनेक मान्यवर उपस्थित होते


