आमचे ऊर्जास्रोत डॉ आंबेडकर आहेत. 1 जानेवारी 1818 चा इतिहास हा व्यवस्थे विरुद्ध चा बदला आहे. संभाजी महाराज यांची वडू बुद्रुक येथील समाधी बरेच काही सांगून जाते. मनुस्मृती प्रमाणे केलेली हत्या व शूद्रांना मिळणारी वागणूक ही मनुस्मृती प्रमाणे होती. गळ्यातील गाडगे,पाठीवरील खराटा,शिक्षणावरील बंदी व माणूस असून ही माणसाप्रमाणे वागणूक मिळत नव्हती.गाई कुत्रे भटकी जनावरे मुक्तपणे पाणी पीत होते भक्ष्य करू शकत होते परंतु या आमच्या जिवंत माणसांना पशुहीन वागणूक मिळत होती.
आम्ही ही हिंदूच होतो तर अमच्यवरच अन्याय अत्याचार का? अत्याचार करणारे पेशवे होते हे इतिहासाने अधोरेखित केले आहे.यांचा परशुराम सांगतो पृथ्वी ही मी एकवीस वेळा निक्षत्रिय केली आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ते संभाजी महाराज यांना हे पेशवे ब्राह्मण शूद्र समजत होते व म्हणून महाराजांचा राजांचा राज्याभिषेशक पायाच्या डाव्या अंगठ्याने केला होता व छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या ही कोणत्या कायद्याने झाली हे पण जाणतो आहोत कारण महाराज युद्धात निष्णात होते संस्कृत पंडित होते याच कारणाने केलेला गुन्हा म्हणून त्यांना शिक्षा झाली हे सर्वश्रुत आहे.
भीमा नदीच्या तीरावरील नरसंहार हा 500 विरुद्ध 28000 हजार असला तरी हा लढा शूद्र अतिशूद्र विरुद्ध पेशवाई चा होता अन्न, पाणी व जिवाच्या आकांताने लढणारे सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या अपमानाचा व केलेल्या सुलतानी अत्याचाराचा बदला घेणारे जगातील आदर्शवत असे उदाहरण आहे म्हणून इंग्रजांनी त्यांच्या प्रित्यर्थ हा विजयस्तंभ उभारला आहे.
1 जानेवारी 1927 ला बाबासाहेब हेच सांगत आहेत तुम्ही शुरांची संतान आहे हा इतिहास आपणांस माहीत पाहिजे असे ठणकावून सांगत आहेत रयतेच्या रक्षणाच्या आड येणारे या देशातील मुघल औरंगजेब,अफजलखान, पेशवे,ब्राह्मण अथवा बाजीराव पेशवे असोत हे स्वराज्याचे शत्रू आहेत त्यामुळे हिंदू धर्माचा नकली बुरखा पांघरून स्वराज्य,छत्रपती,बारा बलुतेदार ,अठरा पगड जाती,शूद्र,अतिशूद्र यांना खोटा इतिहास सांगून माथी भडकावून नका..कारण मराठा समाज व बहुजन जागृत होत आहे धर्मसत्ता ही तुमची मक्तेदारी नाही.
उद्धव ठाकरेसाहेब,अजित पवारसाहेब ,बाळासाहेब आंबेडकर साहेब हे मर्मावर बोट ठेवत आहेत.अर्थसत्ता,राजसत्ता व धर्मसत्ता एका वर्गाची झाली, तर देशाचे आमचे वाटोळे होण्यास विलंब लागणार नाही.
1 जानेवारी वेळी नियोजन पद्धतीने आंबेडकरी समुदयास डीवचण्याचे उद्योग झाले आहेत.भिडे,एकबोटे व आता तो टरफल अजय शिंगर ही कोणाची पिलावळ आहे आम्हास माहीत आहे.त्यामुळे कायद्याने वागू या व फायद्यात राहू या.
