नीरा नरसिंहपुर:
दिनांक 27;
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांचे सरपंच व सदस्य निवडून आलेल्या सर्वांचे सत्कार व सन्मान भरणेवाडी येथील माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर तसेच राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 12 नवनिर्वाचित सरपंच व 6 ग्रामपंचायत मध्ये बहुमत असलेल्या सर्व सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी जवळपास 154 ग्रामपंचायत सदस्य यांचा फेटा घालून शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जवळपास 2 हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला.यावेळी बहुतांशी पत्रकारांनी हा सोहळा लाईव्ह प्रक्षेपण केला होता. या लाईव्ह प्रक्षेपणावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांच्या समोर सरपंचांची शिरगणतीच केली हे साऱ्या तालुक्यानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि जर या लाईव्ह व्हिडिओ वर भाजप पक्षाच्या तालुकाध्यक्षाला तसेच त्यांच्या नेत्यांना विश्वास राहिला नसेल तर मागच्या आठवड्यात निराभिमा कारखान्यावरील उसाच्या टनेजमध्ये काटा मारून शेतकऱ्यांची लय लूट चाललेल्या खोट्या धंद्यावर शेतकऱ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बनवून सर्वत्र पाठवला होता.
तसेच मागील काही महिन्यांमध्ये आपल्या मालकीचा सोलापूर जिल्ह्यातील असलेला खाजगी कारखाना तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी केबिनमध्ये जाऊन काचा फोडून तो व्हिडिओ संपूर्ण टीव्ही चॅनल दाखवलेला तसेच कर्मयोगी कारखान्यावरती आंदोलन करून आत्महत्या करण्याचा इशारा देणाऱ्या गरीब कष्टकरी शेतकर्यांचा लाईव्ह व्हिडीओ जर आपल्याला मान्य नसेल तर आपण सहकारी कारखाने लुटून टक्केवारी कमिशन घेऊन शेतकऱ्यांच्या एफ आर पी न देता कामगारांचा पगार न देता सर्व शेतकऱ्यांचा व कामगारांचा कष्टाचा पैसा लुटून खाल्लेल्या तुमच्या हर्षवर्धन पाटलांना दोनदा विधानसभेला धुळ चारून सुद्धा अजून खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे हा धंदा चालू ठेवला असेल तर इंदापूर तालुक्यातील भाजप पक्षाचे तालुकाध्यक्ष यांना अजून हे खोटं वाटत असेल आणि लाईव्ह व्हिडिओ वरती विश्वास बसत नसेल तर आपल्याला आता मानसोपचार तज्ञाकडून तपासण्याची गरज असल्याचे वाटत आहे यासाठी उद्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून इंदापूरच्या या पेशंटला दाखल करून घेण्याची विनंती करणार आहे तरी वकील असलेल्या शरद जामदारांनी यावर डोकं शांत ठेवून वेळीच उपचार करून घ्यावे कारण यापुढे इंदापूर तालुक्यातील विकास कामांची तसेच पक्षवाढीची बुलेट ट्रेन सुसाट धावत राहत असल्याने यापुढचे धक्के आपल्याला सहन होणार नाही म्हणून आपण वेळीच उपचार करून घ्यावे असे गरजेचे वाटते असा उपरोधीत टोला तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी या वेळी दिला….
