भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष व राज्याचे विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना भीक लागल्याने शिक्षक व संस्थाचालक यांच्याकडून भीक देणार असल्याचे सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात सदर भूमिका विशद केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बेताल वक्तव्य करून महाराष्ट्र व देशाचा अपमान केला आहे राज्याचे राज्यपाल महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर बदनामी करत आहेत.आमदार लाड महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगतात तर चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आल्याने ते महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करतात ” ते म्हणतात महात्मा फुले व डॉ आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या तुम्ही कशाला सरकारच्या अनुदानाची वाट पाहत आहात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी समस्त जनतेची संस्थाचालक व शिक्षक यांची माफी मागावी अन्यथा पुरोगामी महाराष्ट्र हे अजिबात खपवून घेणार नाही
त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा व मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अन्यथा या बेताल वाचाळविर चंद्रकांत पाटील यांना आम्ही शिक्षकांच्या घामाचे,कष्टाचे व संस्थाचालकांच्या मेहनतीचे पैसे भीक म्हणून देणार व त्या भिकेतून त्यांनी त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात असे ही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे .लवकरच जाहीररीत्या त्यांना आम्ही भीक देणार असल्याचे सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज ,महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श व जीवनाचा श्वास आहे त्यामुळे आम्ही त्यांची बदनामी खपवून घेणार नाही असे ही त्यांनी म्हटले आहे.