मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत खेळाडूंचा येथोचित सन्मान
कराटे द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2022दि.5/6 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर ,औरंगाबाद येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत 32 जिल्ह्यातून 600 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
सोलापूर जिल्ह्यातून 1)आरुष ओहोळ ब्राँझ मिडल, 2) वेदांत पवार काता ब्राँझ मिडल, 3) यशोदीप लोकरे काता ब्राँझ मिडल, 4) श्रेयशी शिंदे या खेळाडूंनी बहुमूल्य कामगिरी बजावत सोलापूर जिल्ह्याचा मान राखला व यश संपादन केले.
या खेळाडूंचा मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान गौरव सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी मोडनिंब पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल आतार साहेब, मोडनिंब ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, उपसरपंच अमित कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कैलास तोडकरी, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गोटू शिंदे, राहुल पाटील, मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा RPI प.म.चे सचिव नागनाथ ओहोळ, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे महादेव गाडे, शाहू फुले आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गाडे, PB ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बालाजी वाघमारे, दत्तात्रय देशमाने, संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचे विनोद नागटिळक, खेळाडूंचे पालक विजय ओहोळ, शरद पवार, आदी उपस्थित होते. या खेळाडूंना राज्य संघटनेचे अध्यक्ष सल्लाउद्दीन अन्सारी सर, सचिव संदीप गाडे सर, सोलापूर जिल्हा असोसिएशनचे सचिव वाल्मीक जाडकर सर, क्रीडा प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय पंच शंकर जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंचा सत्कार सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
