वेळापूर प्रतिनिधी,
वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवार आपापल्या परीने तयारी व फील्डिंग करताना दिसत आहेत उत्तम जानकर आणि माने देशमुख हे प्रतिस्पर्धी विरोधी गट समजले जात असले तरी आता मात्र तिसऱ्या आघाडीचा उदय होण्याची शक्यता झाली असून त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा ऐकवयास मिळत आहे. नुकतीच वीर हॉटेल येथे तिसऱ्या आघाडीची महत्त्वपूर्ण प्राथमिक चर्चा संपन्न झाली असून यामध्ये निवडणूक संदर्भात ठोस निर्णय झाला आसल्याची चर्चा आहे दोन्ही गटावर नाराज व असंतुष्ट असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी बांधुन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा यावेळी ठाम निर्णय झाला असल्याचा ऐकवयास मिळत आहे.
त्यामुळे वेळापूर ग्रामपंचायत निवडणूकती ट्विस्ट निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
