निरा नरसिंहपुर,
दिनांक- 18
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” या अभियाना अंतर्गत पिंपरी बुद्रुक सब सेंटर यांच्या मार्फत सर्व महिला भगिनींसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांमध्ये मासिक पाळीचे विकार, डोळ्यांचे विकार, शुगर, रक्त लघवी तपासणी तसेच संधिवात आणि इतर आजारांविषयी तपासणी, सल्ला आणि औषधोपचार देण्यात आले. हे शिबिर नीरा नरसिंहपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन निरा नरसिंहपुर गावच्या सरपंच सौ. अश्विनी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच सौ.रेणुका आनंद काकडे तसेच आदर्श ग्रामसेवक श्री. गणेश लंबाते साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन आणि नियोजन हे डॉक्टर सुमित्रा कोकाटे मॅडम, आशाताई सौ.अश्विनी देवळे मॅडम, सौ रफिया तांबोळी मॅडम,सौ. रूपाली चव्हाण मॅडम,सौ. सुरेखा क्षीरसागर मॅडम,सौ. मालन जगताप मॅडम, एम.पी. डब्ल्यू . बोडरे सर आणि सौ. प्रियंका पाटील मॅडम तसेच अटेंडी सौ. सुरेखा पाटील मॅडम इत्यादी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ. कोमल किशोर मोहिते मॅडम, सौ.सुरेखा दशरथ राऊत मॅडम, सौ. रूपाली उमेश कोळी मॅडम आणि इतर गावातील शेकडो महिलां उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर सुमित्रा कोकाटे मॅडम म्हणाल्या की महिलांमध्ये जे काही रोग आणि आजार असतील त्याच्यावर आपण पूर्णपणे औषध उपचार देऊन ते बरे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असे शिबिर वारंवार घेऊन आपण महिलांचे आरोग्य हे सुदृढ करणार आहोत.
