शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे बंडखोर आमदार, अपक्ष आमदार व इतर छोटे पक्ष यांचा पाठिंबा आहे. दरम्यान ते एकटेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप सत्तेत राहणार असले, तरी या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार नाहीत ,तर शिंदे आज सात वाजता शपथ घेणार आहेत.
